चिमुरडी बनली कृष्ण
यावेळी छोट्या चिमुरडीने कृष्णाचा वेष परिधान केला होता. यावेळी छोट्या वर्गातील मुलांसह मोठ्या वर्गातील विद्यार्थी देखील या सगळ्या उत्सवात सहभागी झाले होते. तर मोठ्या विद्यार्थ्यांची दही हंडी देखील साजरी झाली.
महाराष्ट्रातील एकमेव अंध गोविंदा पथकाने लावला दहीहंडीचा थर; असा रंगला थरार
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद कृष्णालाही हवाहवासा
advertisement
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद कृष्णालाही हवा हवासा वाटेल असाच होता. गोविंदाच्या गाण्यावर लहान मुलांची पाऊले थिरकलेली पाहिला मिळाली. यावेळी शाळेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी देखील पाणी फवारून मुलांचा आनंद द्विगुणित केला.
चोर दहीहंडी का साजरी करतात, काय आहे यामागील परंपरा?
या शाळेत विविध उपक्रम आणि सणवार साजरे केले जातात. आम्ही कोणत्याही सणांना मुलांना सुट्टी देत नाही. त्याऐवजी आम्ही मुलांना सणाचा मुख्य हेतू त्यामागची कथा , त्यामागची संस्कृती समजून देण्याचा प्रयत्न करतो आणि सणांचा आनंद शाळेत सर्वजण एकत्र साजरा करतो अशी माहिती विवेक पंडीत यांनी दिली. यावेळी मोठ्या मुलांसाठी एक हंडी आणि छोट्या मुलांसाठी एक हंडी अशा दोन हंड्या फोडण्यात आल्या.





