महाराष्ट्रातील एकमेव अंध गोविंदा पथकाने लावला दहीहंडीचा थर; असा रंगला थरार
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गोविंदा पथकांनी दहीहंडी सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. मुंबईत अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुलं आणि मुलींची दहीहंडीचा थर लावला.
मुंबई, 7 सप्टेंबर : गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात देशभर दहीहंडीचा जल्लोष मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. मुंबईतही आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमध्ये आयडियल बुक डेपो येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याची ओळख सेलिब्रिटी दहीहंडी अशी देखील आहे. या ठिकाणी आज सकाळपासूनच गोविंदा पथकांनी दहीहंडी सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्याचाच आज नयन फाउंडेशन या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुलं आणि मुलींच्या दहीहंडीचा थर लावला.
दहीहंडीला सलामी
दादर येथे नयन फाउंडेशन या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुलींची तीन थरांची तर मुलांची चार थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडीला सलामी दिली. ‘नयन फाउंडेशन संस्था अंध मुलांचा मनोरा रचणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आम्ही मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यावर्षी देखील आम्ही आमची परंपरा कायम राखत मुलं आणि मुलींचे थर लावले आहेत’, अशी माहिती यावेळी नयन फाउंडेशनसंस्थचे अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र यांनी दिली.
advertisement
चोर दहीहंडी का साजरी करतात, काय आहे यामागील परंपरा?
नयन फाउंडेशन ही संस्था दहीहंडीचे थर लावणारी एकमेव संस्था असून, ह्या संस्थेचे अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र हे स्वतः देखील अंध आहेत. ही संस्था दरवर्षी दादर येथे दहीहंडीला सलामी देते. दादर येथे या संस्थेला विशेष मान आहे. या गोविंदा पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलं कोणत्याही गाण्याच्या तालावर मानवी मनोरा रचण्याची प्रॅक्टिस करत नाहीत. केवळ शिट्ट्या आणि टाळ्यांच्या आवाजावर ही मुलं मानवी मनोरा रचतात आणि हांडीला सलामी देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2023 2:45 PM IST

