advertisement

Sahar Sheikh: 'कैसा हराया' म्हणत 'मी माफीनामा दिला नाही, आता तरी...' सहर शेखने केली विनंती

Last Updated:

हिरवा रंग हा आमच्या पक्षाच्या झेंड्याचा आहे. समाजवादी पार्टीचा झेंड्यातही हिरवा रंग आहे, इतर पक्षाच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे.

News18
News18
मुंब्रा: " मी जे बोलले त्यावर विनाकारण गोंधळ घातला गेला, पण सगळे चुकीचे आरोप आहे. सगळ्यांनी माझ्या बाजूने भूमिका मांडली. मी कोणताही माफीनामा सादर केला नाही.⁠ माझ्या वक्तव्याचा विप्रयास केला गेला आहे" असं म्हणत एमआयएमची नगरसेविका सहर शेखने आता यू-टर्न घेतला आहे. तसंच, "माझ्या बोलण्यातून कोणत्याही लोकांची धार्मिक भावना दुखावली नाही. त्यामुळे आता हा वाद थांबवा, जर कुणाला काही बोलायचं असेल तर माझ्या कामावर बोला." अशी विनंतीही सहर शेख हिने केली.
"संपूर्ण मुंब्रा हिरवा रंगाचा करणार" या वक्तव्यामुळे वादात सापडलेली मुंब्र्यातील एमआयएमची नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख हिची एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. यावेळी जलील यांनी सहर शेखची जोरदार पाठराखण केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सहर शेखने माफीनाम्याच्या वक्तव्यावर घुमजाव केला आहे.
"इम्तियाज जलील यांनी दिलेली प्रतिक्रिया ही माझी प्रतिक्रिया आहे, त्यांनी माझ्याशी संवाद साधला. माझ्यावर कोणताही दबाव नाही. देशाभरातील माध्यमांनी आम्हाला घेरलंय, सगळे चुकीचे आरोप आहे. सगळ्यांनी माझ्या बाजूने भूमिका मांडली. मी कोणता माफीनामा सादर केला नाही. हिरवा रंग हा आमच्या पक्षाच्या झेंड्याचा आहे. समाजवादी पार्टीचा झेंड्यातही हिरवा रंग आहे, इतर पक्षाच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. जर ते राजकीय लोक संपूर्ण शहर भगवा करणार असं बोलत असेल तर तरे चुकीचं नाही. पण, मी बोलली तर फक्त मुस्लिम लोकांना हिरव्या रंगााशी जोडलं जातं. हे चुकीचे आरोप आहे' असं स्पष्टीकरणच सहर शेखने दिलं. तसंच, कैसे हराया, असं म्हणत पुन्हा एकदा तिने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
advertisement
'अहमदुल्लाह अर्थ समजून घ्या'
हिंदुस्थान फक्त मुस्लिमांचा नाहीये तर हिंदू -मुस्लिमांचा आहे. लोकांसाठी महत्त्वाचं आहे. लोकांनी मुस्लिम आणि हिंदू करणे बंद करावे. एमआयएम सत्तेत येत आहे. मी माझ्या माझ्या भाषणात बोलताना अहमदुल्लाह  असं म्हटले, पण याचा अर्थ एकदा काढून पाहा, अहमदुल्लाहचा अर्थ आहे 'ईश्वरा धन्यवाद' आणि 'इंशाअल्लाह' चा अर्थ म्हणजे 'ईश्वराची इच्छा असेल तर' असा होता. यात चुकीचं काही नाही.  आम्ही आमच्या भाषणात हे बोलत असतो, जसं तुम्ही देवाचे कृपाने म्हणतात तसं मी म्हणाले आहे. त्यामुळे कोणत्याही लोकांची धार्मिक भावना दुखावली नाही. त्यामुळे आता हा वाद थांबवा, जर कुणाला काही बोलायचं असेल तर माझ्या कामावर बोला' असं आवाहन सहर शेख हिने केलं.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Sahar Sheikh: 'कैसा हराया' म्हणत 'मी माफीनामा दिला नाही, आता तरी...' सहर शेखने केली विनंती
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement