महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सिव्हिव इंजिनिअरनी याबाबत माहिती आहे. या माहितीनुसार, बारवी धरणातून येणारं पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसी घेते. तिथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा व मुंब्रा परिसराला वितरित केलं जातं. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडीत होईल.
advertisement
संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असं आवाहन एमआयडीसीने केलं आहे. 18 ते 19 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने देखील केलं आहे.