ठाणे : गणेशोत्सवामध्ये अनेक घरांमध्ये उकडीचे मोदक बनवले जातात. परंतु काही जण गव्हाच्या पिठाचे मोदक सुद्धा बनवतात. हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवताना पुरणाचा अंदाज व्यवस्थित असावा लागतो. हे गव्हाचे पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पाहुयात.
साहित्य -
मोदकांच्या पारीसाठी लागणारे साहित्य - एक वाटी मैदा, एक वाटी गव्हाच पीठ, एक वाटी रवा, दोन चमचे तूप, अर्धा वाटी दुध आणि चवीपुरतं मीठ.
advertisement
सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य - एक वाटी ओलं खोबरं, गुळ, खवा, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट.
‘आप्पाचा विषय लय हार्ड’, रॅप सोशल मीडियावर तुफान गाजतय रॅप साँग, कोण आहे हा तरुण?
कृती - सर्वप्रथम गॅस वर कढई ठेऊन त्यात 2 चमचे तूप घालून ड्रायफ्रूट घालावे. त्यानंतर कढईत गुळ घालावे. गुळ विरघळला की मग त्यात ओलं खोबरं टाकून व्यवस्थित मिक्स करावे. एकत्र करुन घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी चव येण्यासाठी खवा आणि वेलची पावडर घालावी. अश्या पद्धतीने सारण तयार होईल.
आता एक वाटी मैदा, एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी रवा, दोन चमचे तूप, अर्धा वाटी दुध आणि चवीपुरते मीठ या गोष्टी एकत्र करुन पीठ मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. हे गोळे व्यवस्थित पातळ हाताने लाटून त्यात तयार केलेले सारण भरा. त्यानंतर दुध कडेला लावून मोदक बनवण्यासाठी लागणारी पारी दाबून घ्या. दुधामुळे पारी चिकटायला मदत होते.
मोदक बनवून तयार झाल्यानंतर गरम तेलात ते सोनेरी रंगाचे होई पर्यंत तळून घ्यावे. अशा पद्धतीने तुमचे तळणीचे मोदक तयार होतील.