TRENDING:

MHADA Lottery: हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! तारीख ठरली, या महिन्यात 4000 घरांची लॉटरी

Last Updated:

MHADA Lottery: ठाणेकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. लवकरच 4 हजार घरांची लॉटरी निघणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: महानगरांत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) लवकरच 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. जुलैमध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीत ठाणे आणि कल्यामधील घरे असणार आहेत. विशेष म्हणजे यातील 1 हजारांहून अधिक घरे ठाण्यातील चितळसर येथे आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरांत घरांचं स्वप्न साकार होणार आहे.
MHADA Lottery: हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! तारीख ठरली, या महिन्यात निघणार 4000 घरांची लॉटरी
MHADA Lottery: हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! तारीख ठरली, या महिन्यात निघणार 4000 घरांची लॉटरी
advertisement

दरवर्षी मुंबई आणि राज्यातील इतर महानगरांमध्ये सामान्य माणसाला घर खरेदी करता यावे यासाठी म्हाडा लॉटरी आयोजित करते. 2024 मध्ये म्हाडाने मुंबई विभागासाठी लॉटरी काढली. आता कोकण विभागासाठी लॉटरी काढण्यात येईल. जुलै महिन्यात कोकण विभाग आणि ठाणे शहरांसाठी लॉटरी काढण्यात येईल. म्हाडाच्या कोकण विभागाने गेल्या दीड वर्षात तीन लॉटऱ्या काढल्या असून याद्वारे सुमारे 10 हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलैमध्ये निघणाऱ्या लॉटरीने अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे.

advertisement

Horoscope Today: संघर्षाचा काळ संपला, आजचा दिवस खास, पाहा तुमच्या राशीचं भविष्य

ठाण्यात सर्वाधिक घरे

कोकण विभागातील सोडतीमध्ये ठाणे आणि कल्याण परिसरात सर्वाधिक घरे असणार आहेत. यामध्ये ठाण्यातील चितळसर येथील 1173 घरांचा समावेश असतो. म्हाडाला कल्याणमध्ये 2500 घरे मिलणार आहेत. याशिवाय, म्हाडाच्या गृहनिर्माण साठ्यातून मिळालेल्या घरांचाही यामध्ये समावेश करण्यात येईल.

advertisement

मुंबईत 5 हजार हून अधिक घरे बांधणार

म्हाडाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात मुंबईतील 5,199 घरांचा समावेश आहे. यामुळे म्हाडा घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दिलासा मिळेल. तर म्हाडाच्या अर्थसंकल्पात कोकण विभागात 9,902, पुण्यात 1,836, नागपूरमध्ये 692, छत्रपती संभाजी नगरमध्ये 1,608, नाशिकमध्ये 91 आणि अमरावतीमध्ये 169 घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
MHADA Lottery: हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! तारीख ठरली, या महिन्यात 4000 घरांची लॉटरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल