35 रुपयात का करत आहे साड्यांची विक्री?
साड्यांचे दर हे क्वालिटीवर ठरत असतात. उल्हासनगर मार्केटमध्ये 35 रुपयात मिळणाऱ्या साड्या आहेत. पण या अत्यंत साध्या आहेत. येथे खरेदी करण्यासाठी येणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रातून येतो. घरात सातत्याने साड्या वापराव्या लागतात. त्यावेळी महिला साध्या साड्यांना पसंती देतात. इतकेच नव्हे तर गरीब घरातील महिलांनाही साड्या घेता याव्या यासाठी 35 रुपयांपासून साड्या विक्रीसाठी ठेवल्याचे शगुन टेक्सटाइल या दुकानाचे मॅनेजर संतोष पाटील यांनी सांगितले.
advertisement
घराची खिडकी सजवा स्वस्तात, या ठिकाणी मिळतात 100 रुपयांत पडदे PHOTOS
साडी विक्रीमध्ये विविध ऑफर्स
उल्हासनगरमधील दुकानात होलसेल दरात साड्यांसाठी खास ऑफर आहेत. अगदी 35 रुपयांपासून ते 10 हजारापर्यंत साड्या या दुकानात उपलब्ध आहेत. साड्या विकताना प्रत्येक साडी मागे 10 ते 50 टक्के सूट अशी ऑफर चालू आहे. ही ऑफर केवळ मान्सूनपुरती मर्यादित असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
विविध प्रकारच्या साड्या
होलसेल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. यात कांजीवरम, पैठणी, पेशवाई, सेमी पैठणी, ऑर्गेंझा, गार्डन, काठ पदर, बरणी सिल्क, शालू अशा विविध प्रकारातील साड्या आहेत. या साड्यांचे दर साडीचा प्रकार आणि गुणवत्ता यावरून ठरतात. ग्राहकांची पसंती या विविध प्रकारच्या साड्यांना असते, असे दुकानदार सांगतात.
बाप्पा येतोय, सजावटीचं काय? मुंबईकर चालवतायत खास लायब्ररी, Video
येथून येतात विक्रीसाठी साड्या
विशेष म्हणजे शगुन टेक्सटाइल मधील साड्या सुरत येथून येतात. बाकी सर्व साड्या येवला, मध्यप्रदेश, कर्नाटक येथून मागवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या साड्यांचे रंग, पोत आणि कमी किंमत पाहून महिला वर्ग येथे गर्दी करताना दिसून येत आहेत.
महिलांची पसंती
साडी घेताना महिला वर्ग प्रत्येक साडी पारखून घेत असतात. काही महिलांना साडीचा प्रकार आवडतो काही महिलांना रंग तर काहींना डिझाईन आवडते. सध्या इंग्लिश कलर घेण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. विशेष म्हणजे काठ पदर साड्या घेतानाही बारीक काठ, जाड काठ, पदरावरील डिझाईन नेमकी कशी आहे? हे सर्व पाहूनच महिला खरेदी करत आहेत. साडीचे कापड मऊ असेल तर महिला साडी घेतात, अशी माहिती पाटील देतात.
कधी - सकाळी 10.30 ते रात्री 9.30
कुठे - शगुन टेक्सटाइल, शॉप नंबर -3, शक्रापुरी धर्मा शाळेच्या समोर, उल्हासनगर-2 , जिल्हा - ठाणे