advertisement

महाराष्ट्रात 1200 कोटींचा ‘फ्रॉड’, 11 हजार जणांना गंडवलं, तुम्ही तर फसला नाहीत ना?

Last Updated:

TWJ Fraud: 11 हजार जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्यासह तिघांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 1200 कोटींचा ‘फ्रॉड’, 11 हजार जणांना गंडवलं, तुम्ही तर फसला नाहीत ना?
महाराष्ट्रात 1200 कोटींचा ‘फ्रॉड’, 11 हजार जणांना गंडवलं, तुम्ही तर फसला नाहीत ना?
ठाणे: अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मार्ग बरोबर असल्यास काहींना यश मिळतं, पण चुकीच्या मार्गाला गेल्यास मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. असाच काहीसा धक्कादायक प्रकार पुढे आला असून 1200 कोटींच्या फ्रॉडमध्ये तब्बल 11 हजार जणांची फसवणूक झालीये. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी समीर आणि नेहा नार्वेकर दाम्पत्याला गुजरातमधून अटक केलीये.
कशी झाली फसवणूक?
राज्यातील हजारो जणांना गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठे रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार एक ते दहा लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना तीन टक्के, 11 ते 25 लाख गुंतवणाऱ्यांना चार टक्के, तर 25 लाख रुपयांहून अधिकची गुंतवणूक केल्यास पाच टक्के परतावा आणि कंपनीत भागीदारी सांगण्यात आले. त्यानुसार 11 हजार गुंतवणूकदारांची 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाली. यामध्ये ठाण्यातील 432 गुंतवणूकदार असून त्यांची 72 कोटींची फसवणूक झाली.
advertisement
सरकारी प्रकल्पांत मोठे कंत्राट मिळण्याचा दावा
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले होते. तसेच सरकारी प्रकल्पात मोठे कंत्राट मिळणार असल्याचा दावा करत अनेकांना जाळ्यात ओढले होते. 9 फेब्रुवारी 2024 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान या टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, अमित बालकम, संकश घाग, घारघर येथील व्यवस्थापक सागर कदम आणि ठाण्यातील वागळे इस्टेट येथील व्यवस्थापक सौरव बोंडे यांनी राज्यातील 16 विविध जिल्ह्यांत कंपनीचे काम सुरू केले होते. यामध्ये 11 हजार जणांकडून परताव्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले आणि 1200 कोटी रुपयांचा अपहार केला होता. याबाबत तक्रार ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आली होती.
advertisement
तिघांना गुजरातमधून अटक
नार्वेकर यांच्या कंपनीने राज्यात 1200 कोटींची फसवणूक केली. ही बाब पुढे आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपास सुरू झाल्यापासूनच पोलिसांना गुंगारा देणाऱ्या समीर नार्वेकर (35), त्याची पत्नी नेहा (36) आणि अमित बालम (37) यांना 29 जानेवारी रोजी गुजरातमधून अटक केली.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अल्पमुदतीत श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडू नये. जादा नफ्याचे प्रलोभन दाखविणाऱ्या योजना आणि तशा प्रकारच्या कंपन्यात गुंतवणूक करू नये. या योजना फसव्या असू शकतात. ज्यांची ट्रेड विथ जॅझ सारख्या कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झाली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
महाराष्ट्रात 1200 कोटींचा ‘फ्रॉड’, 11 हजार जणांना गंडवलं, तुम्ही तर फसला नाहीत ना?
Next Article
advertisement
News18 Marathi Exclusive: 'फायटर जेट्स अन् काही शस्त्रं द्या, एका आठवड्यात पाकिस्तानचे दोन तुकडे होतील';  आसिम मुनीरच्या पायाखालची जमीन सरकली, जगभरात मोठी खळबळ
'फायटर जेट्स अन्.., 7 दिवसात पाकिस्तानचे 2 तुकडे होतील'; बलूच नेत्याचे विधान
  • फक्त सात दिवस आणि काही शस्त्रं...

  • बलूचिस्तान पाकिस्तानातून वेगळा होईल

  • बलूच नेत्याचे विधानाने जगभरात मोठी खळबळ

View All
advertisement