ठाणे : माणूस परिस्थितीनुसार शिकत जातो, बदलतो जातो, असं म्हटल जातं. कारण परिस्थिती त्याला खंबीर बनवते. याच कठीण परिस्थितीतून मार्ग काढत राहूल सूर्यराव आणि बाजीराव घुंगरराव या दोघांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. गावाकडील घरची परिस्थिती बेताची असल्याने या दोघांनीही कॉलेज करतं करतंच हाती मिळेल ते काम केले आणि त्या पैशांनी आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
दोघांनी मिळून सुरू केला हा व्यवसाय -
2016 ला दोघांनीही मिळून गुरुकुल कोचिंग क्लासेसची स्थापना केली. हा क्लास सुरू करण्यामागे फक्त व्यवसाय करणे हा हेतू नसून, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच शिक्षण कमी पैशात मिळावं, हा उद्देश आहे. सुरुवातीला क्लास सुरू केल्यानंतर राहुल आणि बाजीराव या दोघांनाही अनेकांनी तुम्ही हे करू शकणार नाही असे म्हंटले. परंतु दोघांचाही आपल्या मैत्रीवर आणि शिक्षणावर प्रचंड विश्वास होता. दोघांच्याही अथक परिश्रमामुळे ते आता यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले.
पोलीस भरतीसाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना झाली मोठी मदत, या तरुणानं केलं महत्त्वाचं कार्य
त्यांचं वैशिष्टय -
बाजीराव आणि राहुल हे दोघेही आपल्या क्लासच्या माध्यमातून दरवर्षी दोन ते तीन गरजूंना मोफत क्लासचे शिक्षण देतात. 2016 ला पहिल्या वर्षी त्यांच्याकडे फक्त दहावीचा एकच विद्यार्थी होता आणि आता एकुण 80 ते 90 विद्यार्थी फक्त इयत्ता दहावीतले आहेत.
एकमेकांच्या साथीने यश -
अगदी बेताची परिस्थिती असणाऱ्या घरातून आलेल्या दोघांनी एकमेकांना आधार देत, एकमेकांच्या साथीने यश संपादन केले. आता त्या दोघांच्या पत्नी ही या त्यांच्या प्रवासात त्यांना मोलाची साथ देत आहेत.
पंढरपुरातल्या रिक्षाचालकाचं कौतुकास्पद कार्य; अपंग, गरोदर महिलांना देतोय मोफत रिक्षासेवा, VIDEO
मैत्रीचे एक उत्तम उदाहरण -
मैत्री असावी तर अशी हे वाक्य या दोघांच्या मैत्रीकडे पाहिल्यावर मनात येतं. आपली परिस्थिती गरीबीची असेल तरीसुद्धा, आपल्याकडे जर बुद्धिमत्ता असेल तर आपण काहीही करू शकतो, कितीही मोठे यश संपादन करू शकतो, हे यांच्याकडे पाहिल्यावर कळते. येणाऱ्या पिढीसाठी राहुल आणि बाजीराव हे दोघेही नवा आदर्श आहेत.





