advertisement

Thane News : सिग्नलवर आता घाम फुटणार नाही; ठाण्यात दुचाकीस्वारांसाठी पालिकेचा 'कूल' प्रयोग

Last Updated:

Thane Heat Action Plan : ठाणेकरांनी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आता भर उन्हात जर वाहन घेऊन बाहेर जाणार असाल तर गरमीपासून जराही त्रास होणार नाही.

News18
News18
ठाणे : मार्च महिना सुरु होताच सर्वत्र उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झालेली आहे. पण आता ठाणे शहरातून जर तुम्ही अशा उन्हाळात सिन्गलवर वाहन घेऊन थांबत असाल तर तुम्हाला जराही उन्हाचा त्रास होणार नाही.
उन्हाचा पारा चढला तरी काळजी नको
शहरात उष्णतेचा वाढता परिणाम लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.  ज्यामध्ये उन्हाळ्यात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये हिरवी जाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना काही वेळ उभे राहावे लागते. यामुळे त्यांना थेट उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रमुख सिग्नलवर हिरवी जाळी उभारणार आहे. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात सावली मिळणार असून उष्णतेपासून दिलासा मिळेल.
advertisement
नागरिकांसाठी गर्दीच्या ठिकाणी पाणपोईची सोय
याशिवाय नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे. बाजारपेठा, बसस्थानके आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी या पाणपोई उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : सिग्नलवर आता घाम फुटणार नाही; ठाण्यात दुचाकीस्वारांसाठी पालिकेचा 'कूल' प्रयोग
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement