Hardik Pandya : नताशा नाही तर पांड्याच निघाला धोकेबाज? स्टेडियमवर गर्लफ्रेंडसोबत फालतूपणा अन् आता इन्स्टाग्राम पोस्टमुळे पोलखोल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahieka Sharma Instagram Story On Hardik Pandya : महिकाच्या इन्टाग्राम स्टोरीने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नताशासोबतच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा सुरू झालीये.
Hardik Pandya Cheated Natasa Stankovic : जेव्हापासून महिका माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझ्यासोबत चांगलंच घडतंय, असं हार्दिक पांड्या नेहमी म्हणताना दिसतो. वर्ल्ड कप आधी पांड्याने महिकासोबतचं नातं लपवून ठेवलं नाही. पांड्याने जाहीरपणे ती माझी गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पांड्याचा फालतूपणा समोर आला. संपूर्ण जग पाहत असताना पांड्या गर्लफ्रेंडसोबत नको त्या गोष्टी करताना दिसला. अशातच आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच आता महिकाच्या इन्टाग्राम स्टोरीने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा सुरू झालीये.
पांड्याला दोन वर्षांपूर्वी भेटली...
हार्दिक पांड्याची न्यूट्रनिस्ट म्हणजेच पोषणतज्ञ केडिया हिने तिच्या इन्टाग्राम पोस्टमध्ये हार्दिक पांड्याचा आणि महिकाचा उल्लेख केला. त्यात तिने हार्दिक पांड्याला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात तिने उल्लेख केलाय की, ती पांड्याला दोन वर्षांपूर्वी भेटली होती. त्याचा एक फोटो देखील तिने पोस्ट केला. त्यात महिका देखील दिसत आहे. याचाच अर्थ नताशासोबत घटस्फोट घेण्याआधीपासून हार्दिक पांड्या माहिकाला डेट करत होता, असं अंदाज नेटकऱ्यांनी लगावला आहे. त्यामुळे पांड्या पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसतोय.
advertisement
advertisement
पांड्या रिलेशनशीपमध्ये होता का?
2024 च्या जुलै महिन्यात हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं होतं. त्याआधीपासून माहिकासोबत पांड्या रिलेशनशीपमध्ये होता का? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. हार्दिक पांड्याची न्यूट्रनिस्टने लिहिलंय की, दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा एचपीला भेटलो तेव्हा मला लगेच जाणवले की तो फक्त ध्येयाचा पाठलाग करत नव्हता तर स्वतःसाठी एक दृष्टी तयार करत होता. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की त्या प्रवासात मला नम्रपणे एक छोटीशी भूमिका बजावता येईल.
advertisement
HARDIK PANDYA CHEATED ON NATAŠA STANKOVIĆ
- After seeing Mehika's Instagram story, it seems like Hardik had been in a relationship with her for the last two years.
- If that is true, it means he was already dating Mehika even before his divorce from Natasa.
- Honestly,… pic.twitter.com/OzAMkeAnvm
— Bemba Tavuma (@gaandfaadtits) March 10, 2026
advertisement
पांड्या सोशल मीडियावर ट्रोल
दरम्यान, ज्यावेळी पांड्या अन् नताशा यांच्या घटस्फोटाची माहिती समोर आली. त्यावेळी नताशावर अनेक आरोप करण्यात येत होते. मात्र, पांड्यानेच नताशाला धोका दिला, अशी कमेंट नेटकरी करत आहेत. पांड्याने आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना चकित केलंय. पण त्याचं मैदानावरील गर्लफ्रेंडसोबतच्या कृतीने अनेकांनी नाकं मुरडली आहेत. अशातच आता पांड्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 12:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : नताशा नाही तर पांड्याच निघाला धोकेबाज? स्टेडियमवर गर्लफ्रेंडसोबत फालतूपणा अन् आता इन्स्टाग्राम पोस्टमुळे पोलखोल









