मीरा-भाईंदर महापालिकेने गायमुख घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले होते. 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या काळात हे काम पूर्ण करण्याचे नियोजित होते. परंतु, शुक्रवारी पहाटेच जोरदार पाऊस झाल्याने हे काम रद्द करावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रस्ता दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.
advertisement
Mumbai Red Alert: दहीहंडी दिवशी अस्मानी संकट! मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड अलर्ट!
घोडबंदर मार्गावर होणाऱ्या डांबरीकरणाच्या कामामुळे ऐन सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये वाहतुकीला फटका बसणार होता. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या मार्गावरून होणारी वाहतूक बंद राहणार होती. भरीस भर दहीहंडीच्या निमित्ताने ठाणे शहर पोलिसांनी शनिवारी अनेक ठिकाणी वाहतूक मार्गामध्ये बदल केले होते. त्यामुळे गोविंदा पथकांच्या बस आणि ट्रक घोडबंदर मार्गावरच उभे केले होते.
गायमुख घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी ठाणे पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा रस्ता बंद केला होता. ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. परंतु, पावसाच्या पाण्यामुळे तूर्तास रस्त्याचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे 15 ते 18 ऑगस्टदरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्ववत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.