प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ होता. मात्र, भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सातव यांच्या राजीनाम्याने विधान परिषदेतून काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे.
भाजपकडून एका दगडात दोन पक्षी!
राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत सध्या विरोधी पक्षनेता नाही. विधानसभेत संख्याबळाचं कारण समोर करत विरोधी पक्षनेता पद नाकारलं जात असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी विधीमंडळ नियमांचा दाखला देत विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही संख्येची अट नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, विधान परिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते सभागृहातून निवृत्त झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे.
advertisement
काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नावाची शिफारस केली आहे. मात्र, सातव यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाली आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची विधान परिषदेची सदस्यसंख्या देखील सहा झाली आहे.
विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. त्यामुळे १० टक्के सदस्य संख्येचा निकष लावल्यास विरोधी पक्षनेते पदाचा दावा करणाऱ्या पक्षाकडे किमान ७ सदस्य असणं आवश्यक आहे. सातव यांच्या राजीनाम्याने काँग्रेसची संख्या आता ६ वर आली आहे. मात्र, विधान परिषदेतील २२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या २२ जागा कमी केल्यास काँग्रेसचे सतेज पाटील हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात. आगामी महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर काही महिन्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत विधान परिषद ही विरोधी पक्षनेत्याशिवाय राहण्याची शक्यता आहे.
