TRENDING:

Success Story: संधी मिळाली अन् सोनं केलं! नाशिककर तनिषाच्या जिद्दीची कहाणी

Last Updated:

Nashik Tanisha Bhandari Success Story: कोरोना काळात नाशिकच्या धानिशा भंडारी या उच्च शिक्षित तरुणीने केक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज नाशिकमध्ये या तरुणीचे चांगलेच नाव प्रसिद्ध झाले आहे. शिवाय, याच व्यवसायामुळे ही तरुणी चांगला रोजगारही मिळवत आहे. तिला ही कल्पना कशी सुचली, हे तिने Local 18 च्या माध्यमातून सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोरोना काळात नाशिकच्या तनिषा भंडारी या उच्चशिक्षित तरुणीने केक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज नाशिकमध्ये या तरुणीचे चांगलेनाव प्रसिद्ध झाले आहे. इतकेच नाही तर याच व्यवसायामुळे ही तरुणी चांगला रोजगार देखील मिळवत आहे. तिला ही कल्पना कशी सुचली हे लोकल १८ च्या माध्यमातून तिने सांगितले आहे.
advertisement

कोरोना काळ हा अनेक लोकांसाठी दुःखात गेला, तर याच काळात अनेकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा एक योग नाशिकच्या तनिषा भंडारी या तरुणीला देखील मिळाला आणि तिने त्याचे सोने केले.

बी.कॉम आणि एम.ए. इंग्लिश या क्षेत्रातून शिक्षण पूर्ण करून तनिषा ही एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. परंतु कोरोना काळात तिला ही नोकरी सोडावी लागली. दरम्यान, या काळात सर्वच घरी बंदिस्त होते, त्यावेळी काय करावे असा प्रश्न धानिशा  हिला देखीलपडला.

advertisement

पूर्वीपासून आई घरात स्किल क्लासेस घेत असे, विविध गोष्टी या क्लासेसच्या माध्यमातून आई इतरांना शिकवत असे. आईला बेकिंग करताना धानिषा ही पाहत असे. "आपणही घरी रिकामे बसलो आहोत, आपणही या गोष्टी बनवून बघूया," अशा विचाराने सुरुवात करून तनिषा आणि तिची लहान बहीण केक बनविण्यास शिकली.

दरम्यान, लहान बहिणीने सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे हे केक कोरोनाकाळात विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर हळूहळू त्यांचे नाव केकसाठी प्रसिद्ध होऊ लागले. कोरोना काळापासून सुरू झालेल्या तिच्या या व्यवसायाला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. इतकेच नाही तर आता धानिषा आपल्या आईच्या आणि बहिणीच्या मदतीने घरीच दिवसाला १० पेक्षा अधिक केक बनवून विक्री करत असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विरारहून दररोज येतात दादरला, लावतात स्टॉल, फ्रॉकवाल्या आजींची कहाणी
सर्व पहा

ती इतरांना नेहमी सांगत असते की, "आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम केले, तर आपण नक्कीच यशाची पायरी गाठत असतो." त्याचबरोबर तिने लोकल १८ सोबत बोलताना सांगितले की, "जर मी नोकरीच करत राहिली असती, तर एका ठराविक जागेवरच माझी ओळख झाली असती, परंतु आज माझ्या स्वतःच्या व्यवसायामुळे मी संपूर्ण नाशिकात प्रसिद्ध झाली याचा आनंद आहे."

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: संधी मिळाली अन् सोनं केलं! नाशिककर तनिषाच्या जिद्दीची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल