गेल्या तीन वर्षांत शहरात एकूण 635 नवजात बालकांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 384 मुले, तर 251 मुली आहेत. ही आकडेवारी आरोग्य यंत्रणेसोबतच सामाजिक स्तरावरही गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडणारी आहे. बालरोगतज्ज्ञांच्या मते, जन्मानंतरचा पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. याच काळात बाळाला आईचे पहिले दूध (स्तनपान) मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, आजही अनेक कुटुंबांमध्ये नवजात बाळाला आधी मध, गुटी किंवा सुवर्णप्राशन देण्याची प्रथा दिसून येते.
advertisement
यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. याशिवाय लसीकरण टाळणे, आजारांचे उशिरा निदान, आणि उपचाराला होणारा विलंब ही बाल मृत्यूमागची प्रमुख कारणे असल्याचे बालरोगतज्ज्ञ यांनी सांगितले आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार, मुलींमध्ये जन्मतःच रोगांविरोधात लढण्याची क्षमता तुलनेने अधिक असते. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही मुलींचा जगण्याचा संघर्ष अधिक सक्षम असल्याचे या आकडेवारीतून अधोरेखित होते. समुपदेशन आणि योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
असे आहे नवजात मुले, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण
- वर्ष 2022 - 2013 जन्म 32376 मृत्यू 8727
- नवजात मुले मृत्यू 129 नवजात मुले मृत्यू 91 एकूण 220
- वर्ष 2023 - 2024 जन्म 30801 मृत्यू 9403
- नवजात मुले मृत्यू 134 नवजात मुले मृत्यू 88 एकूण 222
- वर्ष 2024 - 2025 जन्म 30720 मृत्यू 9105
- नवजात मुले मृत्यू 121 नवजात मुली मृत्यू 72 एकूण 193
