TRENDING:

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात 'कोटींची डील'? तृप्ती देसाई आणि चाकणकरांच्या 'सेटलमेंट'चा मोठा आरोप; SIT चौकशीची मागणी!

Last Updated:

Ashok Kharat Case: या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या तृप्ती देसाई यांनीदेखील आर्थिक व्यवहार करत खरातला अभय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. नाशिकमध्ये एसआयटी कडून अशोक खरात आणि इतरांची कसून चौकशी सुरू आहे. त्याच वेळी या लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक प्रकरणात नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. तर, दुसरीकडे राजकारणही चांगलंच तापू लागलं आहे. या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या तृप्ती देसाई यांनीदेखील आर्थिक व्यवहार करत खरातला अभय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृप्ती देसाईंची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे.
अशोक खरात प्रकरणात 'कोटींची डील'? तृप्ती देसाई आणि चाकणकरांच्या 'सेटलमेंट'चा मोठा आरोप; SIT चौकशीची मागणी!
अशोक खरात प्रकरणात 'कोटींची डील'? तृप्ती देसाई आणि चाकणकरांच्या 'सेटलमेंट'चा मोठा आरोप; SIT चौकशीची मागणी!
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी तृप्ती देसाई यांच्यावर 'कोट्यवधींच्या व्यवहाराचा' आणि 'तडजोडीचा' खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका आरोप काय?

रूपाली पाटील यांनी म्हटले की, अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्याकडे आधीपासूनच उपलब्ध होते. मात्र, देसाई यांनी ते सार्वजनिक करण्याऐवजी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

advertisement

एसआयटी चौकशीची मागणी

"ज्या तृप्ती देसाई महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दावा करतात, त्यांनीच या प्रकरणात तडजोड कशी केली?" असा सवाल रूपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता तृप्ती देसाई यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादात आता दोन महिला नेत्यांनी एकमेकींसमोर ठाकल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात 'कोटींची डील'? तृप्ती देसाई आणि चाकणकरांच्या 'सेटलमेंट'चा मोठा आरोप; SIT चौकशीची मागणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल