मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. एक महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे याच समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताने 25 जणांचा बळी घेतला होता. खासगी बसच्या भीषण अपघातात 25 जण जळून खाक झाले होते. ही घटना अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
advertisement
या उपयायोजनांनंतर कुठेतरी अपघातांना आळा बसल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटले. या अपघातात ट्रकला आग लागली. यानंतर हा ट्रक आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
समृद्धी महामार्गावर वाहन चालकांची होणार डोळे तपासणी, अपघात टाळण्यासाठी उपाय
बुलढाणा जिल्ह्यातील राजनी धानोरा गावादरम्यान हा अपघात झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसल्याचं समोर येत आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन चालकांची डोळे तपासणी -
दरम्यान, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वेगवेगळे उपाय केले जात आहेत. आता नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांनी ही माहिती दिली.
