तुळजाभवानी मंदिर बंदी करणार?
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांचे नाव आल्याने आता मंदिर बंदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर पुजारी व मंदिर प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 16 पुजाऱ्यावर गुन्हे दाखल तर अनेकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुजारी ही आक्रमक झाले आहेत. देऊळ कवायत कायदा पुजाऱ्यावर कार्यवाहीसाठी नाही कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यावर दंडमशाही थांबवा, असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावर केला आहे.
advertisement
ड्रग्स पेडलर प्रकरणात 16 पुजाऱ्यांची नावे
मंदिराच्या बाहेर मंदिराच्या आत कार्यवाही करू नका, असे सांगत पुजाऱ्यांचा मंदिर संस्थांच्या कार्यवाहीला विरोध दर्शवला आहे. ड्रग्स पेडलर प्रकरणात 16 पुजाऱ्यांची नावे आली असून या पुजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदी करण्याचा इशारा मंदिर संस्थांनी दिल्यानंतर पुजाऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 35 जणांना आरोपी करण्यात आलं असून, 80 जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे.
दरम्यान, तुळजापुरात 2019 सालापासून हा ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा होती. या संदर्भात पोलीस व महसूल प्रशासनाकडे पुजाऱ्यांनी तक्रारी देखील केल्या मात्र ठोस असे काही हाती लागत नव्हते. तब्बल दीड हजार मुलं या ड्रग्जच्या आहारी गेल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला. एवढंच नाही तर हे सगळं पोलिसांच्या मर्जीन चालतं सांगून देखील कार्यवाही होत नाही त्यामुळे आता आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा निर्धार पुजारी व्यापारी व नागरिकांनी केल. एवढच नाही तर याच्या विरोधात तुळजापूर शहरात बैठक देखील घेण्यात आली. ड्रग्जचा व्यापार देखील शहरात गजबजल्या ठिकाणी होत असून पोलीस याकडे दुर्लक्ष का करत आहेत? का पाठीशी आरोपींना घालत आहेत? असाच हवाल स्थानिक विचारत होते.