TRENDING:

सावधान! मॅट्रिमोनी साईटवर जोडीदार शोधताय? आधी शरीरसंबंध अन् मग लाखोंची लूट करणाऱ्या भावंडांचा पर्दाफाश

Last Updated:

मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई आणि पुणे येथेही अशाच स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विश्वनाथ सावतं, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : मॅट्रिमोनी संकेतस्थळांचा गैरवापर करत महिलांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक व लैंगिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आदर्श म्हात्रे आणि त्याचा भाऊ अशी दोन भावंडे पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीकडून तब्बल 89 लाख रुपये जप्त करून पीडित महिलांना परत करण्यात आले आहेत.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श म्हात्रे हा विविध मॅट्रिमोनी वेबसाईट्सवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला वैज्ञानिक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) अधिकारी असल्याचे भासवत होता. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आरोपीने उच्चशिक्षित, घटस्फोटित तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य केले होते. विश्वास संपादन केल्यानंतर तो संबंधित महिलांच्या नावावर प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन काढण्यास प्रवृत्त करत असे. कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होताच ती स्वतःच्या खात्यात वळवून आर्थिक फसवणूक केली जात होती.

advertisement

महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर 

तपासात आरोपीने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे. विवाहाचे आमिष, भावनिक जाळे आणि भविष्यातील सुरक्षित आयुष्याचे स्वप्न दाखवत तो महिलांना फसवायचा. विशेष म्हणजे तात्काळ कर्ज उपलब्ध असलेल्या प्रोफाइल्सवर त्याची नजर असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

पाच पीडित महिलांनी तक्रारी दाखल

advertisement

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात पाच पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई आणि पुणे येथेही अशाच स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. प्राथमिक तपासात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने Shaadi.com आणि Jeevansathi.com यांसारख्या नामांकित मॅट्रिमोनी संकेतस्थळांचा वापर केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू 

advertisement

सध्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी पीडित महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मॅट्रिमोनी साईट्सवर ओळख करून घेताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ओला कचरा, सुका कचरा...., तुमचीही सकाळ याच गाण्याने सुरू होते? मग कुणी लिहिलंय?
सर्व पहा

Solapur News: पत्नीला मेसेज केला, पतीचं डोकं फिरलं, मित्रावरच गोळीबार, सोलापूर हादरलं! 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावधान! मॅट्रिमोनी साईटवर जोडीदार शोधताय? आधी शरीरसंबंध अन् मग लाखोंची लूट करणाऱ्या भावंडांचा पर्दाफाश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल