शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्या
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या शेतात काहीही राहिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी द्या. शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच व्याज देणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवू नका, असा आदेश देखील द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. पंजाब सरकारने हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली, तशी मदत करावी, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
advertisement
निवडणुका नाही म्हणून वाऱ्यावर सोडता का?
75 लाख महिलाना बिहारमध्ये 10 हजार खात्यात टाकता, महाराष्ट्राने तुम्हाला भर भरून मदत केली, त्या मतदारांना इथे निवडणुका नाही म्हणून वाऱ्यावर सोडता का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बँकांच्या शेतकऱ्यांना जाणाऱ्या नोटीस थांबवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपला अंगलट आल्यावर फाटा फोडायची सवय आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी तेव्हा पीएम केअर फंडात तेव्हा दिले होते. PM केअर फंडमधून महाराष्ट्राला 50 हजार कोटी तरी द्यावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.