TRENDING:

Uddhav Thackeray : निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक जबर धक्का, आमदार साथ सोडणार?

Last Updated:

Shiv Sena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दाणादाण उडाली. आता या घडामोडीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने विरोधकांची धूळधाण उडवत 234 जागांवर विजय मिळवला. तर, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला 50 जागांवर विजय मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची पहिली विधानसभा निवडणूक असल्याने या दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. निकालात शिंदे आणि अजित पवार यांनी जबरदस्त कामगिरी केली. तर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दाणादाण उडाली. आता या घडामोडीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक जबर धक्का, आमदार साथ सोडणार?
निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक जबर धक्का, आमदार साथ सोडणार?
advertisement

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली जादू दाखवत 57 जागा निवडून आणल्या. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आले. तर, शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र, मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले.

advertisement

उद्धव यांना धक्का बसणार ?

टाईम्स ऑफ इंडियाने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने म्हटले की, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक धक्का बसू शकतो. शिवसेनेतील फुटीनंतर मोठ्या प्रमाणावर आमदार-खासदार फुटून शिंदेंसोबत गेले. मात्र, सामान्य शिवसैनिक हा उद्धव यांच्यासोबत राहिला. लोकसभेतील कामगिरीने पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. विधानसभेत मात्र पक्षाला मोठा धक्का बसला. आता उद्धव यांच्यासोबत निवडून आलेल्या 20 आमदारांपैकी काही जण त्यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.

advertisement

उद्धव यांची साथ का सोडणार?

टाईम्स ऑफ इंडियाने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने सांगितले की, ठाकरे गटाचे काही आमदार आणि आतापर्यंत सोबत राहिलेले पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. निवडणुकीच्या मैदानात एकनाथ शिंदे यांना घवघवीत यश मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांच्यासोबत फक्त आमदार, खासदार गेले नाही तर शिवसेनेचा पारंपरीक मतदारही सोबत राहिला असल्याचे चित्र आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

राजकीय विश्लेषकांच्या मते, महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा कमबॅक करणे अवघड आहे. ठाकरेंसोबत राहिल्याने या आमदारांना आपली कोंडी होण्याचीदेखील भीती आहे. तर, स्थानिक पातळीवरही समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोडू जाऊ शकतात. शिवसेनेत 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी फूट पाडल्यानंतर ठाकरेंबाबत सहानुभूती होती. ती सहानुभूतीची लाट ओसरली असल्याचे समोर आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक जबर धक्का, आमदार साथ सोडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल