इराण आणि इस्रायल (मध्य पूर्व) मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, भारतात एलपीजी (LPG) गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत एलपीजीचा तुटवडा असल्याने लोकांच्या गॅससाठी रांगा लागल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर संतापले
अकोल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या सिलेंडरबाबतच्या नियोजनावर कठोर टीका केली आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता, असे त्यांनी म्हटले.
advertisement
गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये- प्रकाश आंबेडकर
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ उपाययोजना करून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
LPG गॅस सिलेंडरसंदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, आजच निर्णय जारी होणार?
आखाती देशांमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा प्रचंड तुटवडा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाणी आणि वीज कनेक्शन जसे मिळते, तसेच आता पीएनजी अर्थात पाईप लाईनने गॅस कनेक्शन मिळणार आहे. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार आजच घेऊ शकते. आज रात्री उशिरापर्यंत सरकार यासंदर्भातील निर्णय जारी करू शकते, अशी शक्यता आहे.
