डॉ. इंद्रजित वर्मा (MVSC पशुवैद्यकीय मथुरा) हे रायबरेली जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालय शिवगढचे प्रभारी अधिकारी आहेत. त्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वारी चाऱ्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात की ज्वारी (हिरवा चारा) जनावरांसाठी फायदेशीर मानला जातो. परंतु पशुपालक त्याच्या काढणीदरम्यान काही चुका करतात. त्यामुळे जनावरांच्या फायद्याऐवजी नुकसान होते. ते म्हणतात की ज्वारीची काढणी पेरणीनंतर सुमारे ५० दिवसांनी करावी. तसेच सतत पाणी द्यावे. कारण जेव्हा ज्वारीमध्ये पाण्याची कमतरता असते तेव्हा त्यात हायड्रोजन सायनाइड (HCN) चे घटक वाढू लागतात. ज्याचा जनावरांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
advertisement
डायरियासह अनेक आजारांचा धोका असतो
लोकल 18 शी बोलताना इंद्रजित वर्मा सांगतात की, हिरव्या चाऱ्यात आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जनावरांनी हिरवा चारा अधिक प्रमाणात खाल्ल्यास अतिसारासह (डायरिया) इतर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. याशिवाय जास्त त्यातील जास्त ओलावा हा दुधाच्या गुणवत्तेवरही परिणाम करतो. म्हणूनच जनावरांना नेहमी हिरवा चारा मिश्रित कोरडा चारा देणे गरजेचे आहे. तसेच काही प्रमाणात धान्याचे मिश्रणही द्यावे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि याशिवाय असे केल्याने दुधातील फॅटचे प्रमाणही वाढत असते. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा या सूचनांचे पालन करून आपल्या जनावरांचे होणारे नुकसान टाळू शकता.