तेजस्वी भाजपात गेली असली तरी मी अजूनही शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे विनोद घोसाळकर यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखीत घोसाळकर यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिषेक असता तर हा प्रश्न आला नसता, अभिषेक आणि सून यात फरक आहे ना असं म्हणतं त्यांनी हतबलता व्यक्त केली. मुलाचे आपण कधी ही कान धरू शकतो पण सूनबाईचे धरू शकत नाही घर कुटुंब राजकारण असे आम्ही कधी एकत्र केलं नसल्याचंही विनोद घोसाळकर यांनी म्हटले. यावेळी विनोद घोसाळकर यांनी तेजस्वी यांचा भाजपात प्रवेश होण्याआधी घरी काय घडलं याचीही माहिती दिली.
advertisement
तेजस्वीने भाजप प्रवेशाचा निर्णय सांगितला अन्...
विनोद घोसाळकर यांनी सांगितलं की, काल संध्याकाळी माझी पत्नी आणि दोन्ही सुना यांच्यासोबत आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. त्यावेळी तेजस्वीनं, “डॅडी, मी असा निर्णय घेतला आहे,” असे मला सांगितले. कुटुंबप्रमुख म्हणून मला जे सांगायचे होते ते मी तिला स्पष्टपणे सांगितले. मात्,र कोणताही दबाव टाकता येत नाही. ती स्वतंत्र आहे आणि स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे. तिने घेतलेल्या निर्णयावर किंवा त्या क्षणी त्याबाबत काहीही बोलणे योग्य वाटले नसल्याचं त्यांनी सांगितलं.
माझ्यासोबत तिने मोकळेपणाने चर्चा केली आणि मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. त्यानंतर मी तात्काळ पक्षप्रमुखांना तेजस्वीच्या निर्णयाबाबत सांगितलं असल्याचे घोसाळकरांनी सांगितलं.
तेजस्वी घोसाळकरांचा प्रभाग आरक्षित...
मुंबई महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आपण पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे. शब्द अपुरे पडत आहेत, पण तरीही हा संवाद आवश्यक असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
इतर संबंधित बातमी:
'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मनातलं सगळं सांगितलं
