भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
सप्तश्रुंगी गडावर दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक दररोज येत असतात. तलवारीसारखी शस्त्रे हातात घेऊन गुंडांनी केलेल्या या हैदोसामुळे स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी तत्काळ ७ ते ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरीत कारवाई केली.
advertisement
एकाची धिंड, इतरांचा शोध सुरू
या प्रकरणी वणी पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घेत सुमारे ७ ते ८ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत टोळक्यातील एका मुख्य आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि भविष्यात अशी हिंमत कोणी करू नये, यासाठी अटक केलेल्या आरोपीची सप्तश्रृंगी गडावरच धिंड काढली. गडावरील अनेक नागरिकांसमोर ही कारवाई करण्यात आली. मात्र, टोळक्यातील इतर आरोपी अजूनही फरार आहेत. वणी पोलीस फरार असलेल्या गुंडांचा कसून शोध घेत आहेत.
