काय आहे आजोबांचा आहार आणि विचार?
विशेष म्हणजे आजोबा थंड आणि आंबट या वस्तू कधीच खात नाहीत. शिवाय फळं आणि अगदी साधा आहार ते घेतात. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजोबांचे विचार सकारात्मक आहेत. आजोबा कधीही नकारात्मक विचार करत नाहीत. त्यामुळे ते सदैव प्रसन्न असतात. नव्वद वर्षांच्या वयातही त्यांचे विचार सकारात्मक असल्यामुळे त्यांची ऊर्जा ही अगदी कमालीची आहे. आजोबांना बालपणापासूनच गाण्याचा, वादनाचा तसेच खेळ आणि कलेतही प्रचंड आवड आहे.
advertisement
विद्यार्थ्यांमुळे शिक्षक आजोबांना मिळतेय ऊर्जा
विद्यार्थी हे आजोबांसाठी सगळं काही आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्यांची या वयातील ऊर्जा असल्याचं ते सांगतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यात मला प्रचंड आनंद होतो. राष्ट्रगीते आणि समूहगीते विद्यार्थ्यांना शिकवायला लागायची त्यामुळे मलाही त्याचा छंद लागला. मुलांपासून विद्यार्थ्यांपासून मला जीवनशक्ती मिळते, असेही यावेळी आजोबांनी बोलताना सांगितले. मनात सकारात्मक विचार आणि सर्वांप्रती प्रेम भावाने वागण्याची खरी गरज असल्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
शिवरायांची प्रेरणा अन् शिवप्रेमी सायकलवरून निघाला एव्हरेस्ट मोहिमेवर
आजोबा अनेक पुरस्कारांनी सन्मानित
वर्ध्याच्या सेलू येथील दीपचंद चौधरी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना आजोबांना महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. सोबतच नवोपक्रम जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1995 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तरीही त्यांनी आजही आपली कला जोपासली आहे .एखाद्या गोष्टीचा बालपणापासून छंद असला की वयानुसार तो छंद वाढत जातो. खरंतर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असते. मात्र वृद्धापकाळात त्या कलेचा छंद जोपासणारे निवृत्तीनाथ सावरकर हे 90 वर्षांचे आजोबा अनेकांना प्रेरणा देत आहेत.