शिवरायांची प्रेरणा अन् शिवप्रेमी सायकलवरून निघाला एव्हरेस्ट मोहिमेवर
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुबोध गांगुर्डे हा तरुण माउंट एव्हरेस्टवर सायकलने प्रवास करत निघालाय.
नागपूर, 7 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नाते अतुट आहे. या दोन गोष्टीतील अद्वैत समजले तर शिवचरित्राच्या मर्मात शिरता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमहर्षक इतिहास ज्या दुर्गांच्या साक्षीने झाला ते किल्ले आजही एक स्फूर्तिस्थान म्हणून अनेकांना प्रेरणा देतात. याच प्रेरणेतून एक ध्येयवेडा तरुण राज्यातील 350 हून अधिक किल्ले सर करून पुढे स्वराज्याची भगवी पताका जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर फडकवण्यासाठी निघालाय. ते ही चक्क सायकलने प्रवास करत. या ध्येयवेढ्या तरुणाचे नाव सुबोध गांगुर्डे आहे.
सुबोध मूळचा रायगडचा शिवप्रेमी
रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रहावसी असलेला 24 वर्षीय सुबोध गांगुर्डे हा एक शिवप्रेमी आहे. आत्तापर्यं सुबोधने 342 किल्ले सर करत 15,675 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला आहे. गडकिल्ल्यांच्याच साक्षीने आणि साथीने हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. आज त्या किल्ल्यांकडे पर्यटन स्थळ म्हणून न बघता आपण आपला जाज्वल्य इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून त्याकडे बघितले पाहिजे व गडकिल्ल्यांचे पवित्र राखले पाहिजे हा संदेश सुबोध या मोहिमेतून देतो आहे.
advertisement
गडकिल्ले संवर्धनाचा जागर
छत्रपती शिवरायांच्या तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा जागर आणि इतिहासाचा प्रसार करीत सुबोधने 26 नोव्हेंबर 2023 रोजी घर सोडले. त्या दिवसापासून तो अव्याहतपणे महाराष्ट्रातील गड किल्ले सर करण्यासाठी निघाला आहे. आतापर्यंत त्याने 342 किल्ले सर केले असून जवळ जवळ 15,675 किलोमीटरचा सायकलने प्रवासा पूर्ण केला आहे. सुबोधच्या या दृढ निश्चयाचे आणि मेहनतीचे महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि सामाजिक स्तरातून ठीक ठिकाणी कौतुक होत आहे.
advertisement
जगातील सर्वोच्च शिखरावर फडकवायचा आहे भगवा
मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, की माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला. याच मातीने देशात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. आपल्या मातीची महती जगभरात पोहोचावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहोचावा, या अनुषंगाने महाराष्ट्रातील अधिकाधिक गडकिल्ल्यावर भ्रमंती करून या मातीतील रोमहर्षक इतिहास प्रत्यक्ष जाऊन अनुभवावा हा संकल्प मी केला. मात्र केवळ दुर्ग भ्रमंती न करता मी प्रत्येक किल्ल्यातील माती संकलन करून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करणार असून ती पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात ही मूर्ती जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर घेऊन जाऊन छत्रपती शिवरायांचा भगवा फडकवावा हा माझा मुख्य उद्देश असल्याचे मत सुबोधने बोलताना व्यक्त केले.
advertisement
गड किल्ले स्वातंत्र्य प्रेरकतेचे मूलमंत्र
शिवचरित्र म्हणजे एक परीस स्पर्श आहे. ज्यांनी ज्यांनी शिवरायांना आपला गुरु मानले त्यांनी देशासाठी त्यागाची परिसीमा गाठली आहे. तरुणांनी जर भविष्य घडवायचे असेल तर इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना मार्गदर्शक आहे. आपण केवळ आपला इतिहास जाणून घेतला तरी भविष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही. यासह आपले गडकिल्ले हे केवळ दगड मातीचे किल्ले नाहीत तर ती स्फूर्तीस्थळे आहेत. इथल्या मातीत प्रेरणा देणारा वसा आहे. या गडाचे गडपण आपण जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचे मोल जपले जावे या साठी माझी जनजागृती या माध्यमातून सुरू आहे, असे मत सुबोधने बोलताना व्यक्त केले.
advertisement
वाटेत असंख्य आव्हानं
सह्याद्री आणि घाटवाटांमधील हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यात एकट्याने प्रवास करायचा म्हटल्यावर अनेक आव्हान सामोर आली. काही ठिकाणी शरीरांची क्षमता तपासणारी होती. कधी नैसर्गिक आव्हाने होते. या वाटेत पट्टेदारी वाघ, रानगवे, अस्वल, बिबट्या यांचा देखील अनुभव आला. तर कधी जंगलात वाट हरवलं. कोकणातल्या घाट वाटांनी चांगलीच दमछाक केली.उन वारा पाऊस यांचा देखील सामना करावा लागला. मात्र या एकंदरीत प्रवासात महाराजांचे आशीर्वाद आणि महाराष्ट्रातील असंख्य दुर्गप्रेमी शिवप्रेमी आणि काही संस्थेचे मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यामुळे हा अवघड वाटणारा प्रवासातून माझा मार्ग सुकर झाला, असे सुबोध सांगतो.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 07, 2023 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
शिवरायांची प्रेरणा अन् शिवप्रेमी सायकलवरून निघाला एव्हरेस्ट मोहिमेवर