कोणकोणत्या वस्तू आहेत विक्रीसाठी?
अंबाडीचे सरबत, फुले, बेल पावडर, मुलतानी माती, चंदन पावडर, कडुनिंब पावडर, आवळा शरबत व पावडर, गूळ, वेगळे मुराब्बा आणि लोणचे, आवळा, केसांसाठी उपाय कारक असलेले केमिकल मुक्त शाम्पू यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. सेवाग्राम आश्रम तसेच आश्रमासमोर असलेल्या आहार केंद्रामध्ये हा स्टॉल असून या ठिकाणी या वस्तू विक्री केल्या जात आहेत. या ठिकाणी देखील पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम परिसरात राहायचंय? पाहा कशी आहे सोय?
कोणत्या वस्तूंना जास्त मागणी
सेवाग्राम आश्रम तसेच आहार केंद्रात येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामोद्योगाच्या या स्टॉल मधील अंबाडीचे शरबत, बेल शरबत, बेल मुरब्बा, सेंद्रिय गुळ, केसांसाठीचा शाम्पू, अशा प्रकारच्या वस्तूंना जास्त मागणी दिसून येते. सेवाग्राम आश्रमात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अंबाडी तसेच बेलाचे शरबत अधिकच आकर्षित करते आणि या वस्तू शरीरासाठी थंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून खरेदी केली जाते.
वर्धा जिल्ह्यातील ही 10 पर्यटनाची ठिकाणे पाहिलीत का? एकदा नक्की द्या भेट
गांधीजींच्या मार्गावर होतेय कार्य
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण विकासाला चालना दिली. प्रत्येक गावखेडी स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवर लघू उद्योगातून ग्रामीण विकासासाठी प्रयत्न व्हावे, असे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सांगितले होते. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक संस्था तसेच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न केले. महिलांनी तयार केलेल्या कुठलेही केमिकल न वापरलेल्या वस्तू या ग्रामोद्योग केंद्रामध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत. यातून रोजगार तर निर्माण झाला सोबत उत्पादन ते विक्री याची साखळी निर्माण होऊन ग्राहकांना विश्वासार्ह उत्पादने मिळत असल्याचे समाधान दिसून येत आहे.