डबल सीट चालवतात दुचाकी
आजोबांकडे बघून ते तब्बल 90 वर्षांचे आहेत असं कोणीही म्हणणार नाही. या वयातही ते त्यांच्या नातवाला डबल सीट घेऊन गाडी चालवतात. मी ट्राफिक मधूनही चांगली गाडी चालवू शकतो असे त्यांनी सांगितले. नित्यनियमाने ते रोज वर्तमानपत्र वाचतात. त्यांच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या अनेक कवितांच्या कात्रणांचा संग्रह त्यांनी जपून ठेवलाय. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचेही फोटोज सुद्धा त्यांनी जपून ठेवलेत.
advertisement
वय वर्षे 90 तरीही आजोबांनी जपला अनोखा छंद, हे ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
माझी ऊर्जा म्हणजे देवाची देण
आजोबांचा मुलगा दुर्दैवाने या जगात नाही. त्यामुळे आजोबांच्या घरी त्यांच्या सुनबाई आणि एक नातू आहे. 90 वर्षांच्या वयातही आजोबा घरही सांभाळू शकत आहेत. आजोबा याही वयात अनेक काम करतात, चालतात, फिरतात. तरीही तब्येतीच्या फारशा तक्रारी नाहीत. अनेक कार्यक्रमांसाठी तयारी दर्शवतात. सहभागी होतात. कविता लिहायला सुद्धा सुचतात. लेखनाची आणि वाचनाची आवड त्यांनी जोपासलीय. त्यामुळे त्यांची या वयातील ही ऊर्जा म्हणजे देवाने दिलेली देण असल्याचं ते सांगतात.
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम परिसरात राहायचंय? पाहा कशी आहे सोय?
आजोबांची स्मरणशक्ती बघून वर्धेकर थक्क
विशेष काही मेहनत न घेता या वयातील आजोबांची फिटनेस आणि स्मरणशक्ती बघून वर्धेकर थक्क होतात. आजकालच्या तरुण पिढीला मैदानी खेळ हे मैदानात नाही तर मोबाईलवर खेळण्याची सवय आहे. त्यामुळे मोबाईल पासून दूर राहत मैदानात खेळ खेळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आजोबांचे शिक्षण अकरावीपर्यंत एक वर्ष त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर बांधकाम विभाग आणि खाजगी कंपन्यांमध्ये देखील दीर्घकाळ काम केला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आधारवड संस्थेचे ते सभासद आहेत आणि आनंदी कट्ट्याचे हे सदस्य आहेत. तब्बल 90 वर्षांच्या वयातही तब्येत ठणठणीत तसेच वाचन, लेखन, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात हे आजोबा मोठ्या उमेदीने उत्साहाने सहभाग घेतात, ही मात्र कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल.