हिंगणघाट तालुक्यातील खैराटी गावातील ग्रामस्थांची एक समस्या ज्याचा सामना त्यांना जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतरही करावा लागतो आहे. मन हेलावणारा असा हा व्हिडीओ आहे. जो पाहून तुमचा संतापही होईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक अॅम्ब्युलन्स दिसते आहे. अॅम्ब्युलन्समधून काही लोक मृतदेह बाहेर काढतात आणि तो एका बैलगाडीत ठेवतात. आता अॅम्ब्लुलन्स असताना या मृतदेहाला बैलगाडीतून नेण्याची वेळ ओढावली आहे. याचं कारण म्हणजे या गावात रस्ताच नाही.
advertisement
'रक्षाबंधनसाठी हवा भाऊ', लेकीचा हट्ट; पालकांनी उचललं धक्कादायक पाऊल
वाघोली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या खैराटी इथल्या पारधी बेड्यावरील हे दृश्य आहे. इथं पक्का रस्ता नाही त्यामुळे नागरिकांना अशी कसरत करावी लागते. रस्त्याअभावीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. रात्री या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं पण रस्ता नसल्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळेच आपल्या भावाचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. मृतदेह घरी आणतानाही तो रुग्णालयातून पारधी बेड्यावर आणला. पण पक्का रस्ता नसल्याने गाड्या जात नाहीत. त्यामुळए तो तिथून बैलगाडीतून पुढे न्यावा लागला.
या घटनेनंतर प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावं आणि पक्का रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते आहे.
