advertisement

'रक्षाबंधनसाठी हवा भाऊ', लेकीचा हट्ट; पालकांनी उचललं धक्कादायक पाऊल

Last Updated:

मुलीने भाऊ मागताच पालकांनी जे केलं ते धक्कादायक आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : आईबाबा मला भाऊ का नाही किंवा बहीण का नाही? एकुलती एक असणारी मुलं आपल्या पालकांना असा प्रश्न हमखास विचारतात. विशेषतः जेव्हा रक्षाबंधन येतं आणि बहीण भावाला राखी बांधत असेल, या भावंडांना पाहिलं की आपल्यालाही भाऊ किंवा बहीण असायला हवी, असं वाटतंच. अशीच एक मुलगी जिला भाऊ हवा होता. रक्षाबंधनसाठी तिने आपल्या पालकांकडे भाऊ मागितला. मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी पालकांनी जे केलं ते धक्कादायक होतं. यामुळे पोलीसही शॉक झाले.
नवी दिल्लीतील ही घटना आहे. टागोर गार्डनमधील रघुबीर नगरमध्ये राहणारा संजय गुप्ता आणि त्याची पत्नी अनिता गुप्ता या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती. मुलगा 17 वर्षांचा होता पण गेल्या वर्षीच  टेरेसवरून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांची 15 वर्षांची मुलगी रक्षाबंधनला राखी बांधण्यासाठी भाऊ मागू लागली. अखेर या दाम्पत्याने नको तेच पाऊल उचललं.
advertisement
गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एका अपंग महिलेच्या नवजात बाळाचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चट्टा रेल चौकातील फूटपाथवर राहणाऱ्या तक्रारदार दाम्पत्याने असा आरोप केला की, पहाटे 3 वाजता त्यांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचं मूल बेपत्ता असल्याचं आढळून आलं आणि त्यांना कोणीतरी त्याचं अपहरण केल्याचा संशय आला.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दुचाकीवरून दोघंजण परिसरात फिरताना दिसले. त्यांनी सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि एलएनजेपी हॉस्पिटलपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी सर्व तपशिलांचं विश्लेषण केलं आणि बाईक संजयच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळलं.
advertisement
पोलीस टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमधील सी-ब्लॉकमध्ये गेले. महिला कर्मचाऱ्यांसह सुमारे 15 सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांनी  परिसराला वेढा घातला. तिथं त्यांना आरोपी जोडपं आणि अपहरण झालेलं मूल सापडलं. त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलीला रक्षाबंधनसाठी भाऊ हवा होता म्हणून त्याचं अपहरण केल्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त (उत्तर) सागर सिंह कलसी यांनी सांगितलं की, चट्टा रेल चौकाजवळ फूटपाथवरील झोपलेल्या नवजात बाळाचं या दाम्पत्याने अपहरण केलं. या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. पेशाने टॅटू आर्टिस्ट असलेल्या संजयचा यापूर्वी तीन गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'रक्षाबंधनसाठी हवा भाऊ', लेकीचा हट्ट; पालकांनी उचललं धक्कादायक पाऊल
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement