कोण आहेत या कवयित्री?
विदर्भातील या कवियत्रीचे नाव शोभाताई हरिभाऊ कदम आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील रोहणा या छोट्याश्या गावातील शोभाताईंचं वय 85 वर्ष आहे. शोभाताईंच्या भावार्थपूर्ण कवितांमुळे विदर्भाच्या बहिणाबाई अशी त्यांची ओळख आहे. शोभाताई 85 वर्षांच्या वयातही अतिशय उत्साही असून आपला कवितेचा छंद जोपासत आहेत. शिक्षण अवघे दुसरीपर्यंतच मात्र तरीही त्यांना विविध विषयांवरील कविता लिहिण्याची आणि त्यांना चाली देण्याची प्रचंड आवड आहे.
advertisement
वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?
अंदाजे 14 वर्षांचं वय असताना लग्न झालं. आपल्या कुटुंबीयांसह त्या रोहणा गावात राहतात. डोहाळे जेवण, बारसे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्या मोठ्या उत्साहाने गाणी गात असून अनेक गाणी त्यांची स्वरचितही आहेत. 85 वर्षांच्या वयातही त्यांची ही ऊर्जा तरुणाईला लाजवणारीच आहे. या वयातही आपल्या अनोख्या शैलीत कविता त्या गातात. त्यांच्या तडफदार आवाजातील कविता आणि गाणी ऐकून अनेक जण मंत्रमुग्ध होतात. त्यांची प्रत्येक कविता ऐकावीशीच वाटेल अशीच आहे.
कशी झाली सुरुवात?
जुन्या काळात पेन पेन्सिल नव्हती. सुरुवातीला शोभाताई मिळेल त्या वस्तूने अक्षर गिरवायच्या. कधी कोळशाला लेखणी बनवायच्या तर कधी भिंतींना पाटी. मग दिसेल त्या ठिकाणी कवितेची एक ओळ लिहायच्या हळूहळू लिखाणासाठी साधणं मिळाली असे करत करत त्यांनी अनेक कविता तयार केल्या. काही जाणवलेले तर काही अनुभवलेले प्रसंग कवितेतून मांडले.
वय वर्षे 90 तरीही आजोबांनी जपला अनोखा छंद, हे ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
विविध मंचावर झाला गौरव
शोभाताईंच्या सुंदर कवितांनी अनेक पुरस्कार खेचून आणले आहेत. अनेक मंचावर त्यांचा गैरव करण्यात आला. यापुढे देखील शोभाताई कवितांचा छंद जोपासणार आहेत. शोभाताई अवघे सहा सात वर्षांच्या असताना एका कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांची गाणी आणि कविता ऐकून त्यांचे भरभरून कौतुक केलं होतं आजही तो प्रसंग शोभाताई आठवतात आणि अभिमानाने सांगतात. अजूनही शोभाताई विविध विषयांवरच्या कविता लिहितात, चाली देतात आणि गातात सुद्धा शोभाताईंची 85 व्या वयातील ही ऊर्जा,तो निर्भिड आवाज अनेकांना नवी उमेद नवचैतन्य आणि प्रेरणा देत आहे.