नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शनिवारी 24 तासांचा शटडाऊन घेणे अपरिहार्य असून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. यामुळे नागरिकांना या काळात पाणी जपून वापरावे लागेल. तसेच शुक्रवारीच पाण्याचा मुबलक साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, ऐन पावसाळ्यात नाशिककरांना 2 दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरावे लागेल. सोमवारपासून नियमित पुरवठा पुन्हा सुरू होईल.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 19, 2025 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Water Supply: नाशिककर आजच भरून घ्या पाणी, शनिवारी संपूर्ण शहरात पाणीबाणी