आपण गुन्हा केला तरी आपलं काहीच होत नाही ही मानसिकता आरोपीमध्ये बळवल्याने पुन्हा गंभीर गुन्हे होत आहेत. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या आरोपींना वाचवू नये. सर्वांवर मकोका लावा. अल्पवयीन आहेत असं म्हणून म्हणून कुठलाही आरोपी सुटता कामा नये. विशेष करून बीडच्या पालकमंत्र्यांनी हे होऊ देऊ नये, असेही मनोज जरांगे म्हणाले.
उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे: मनोज जरांगे
advertisement
मनोज जरांगे म्हणाले, मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून अजित दादा यांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे. गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल. आता आपली लेकरांनाच मारले जात असेल तर या उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे. बीड जिल्ह्यातील चार-पाच प्रतिष्ठित आणि समाजिक लोकांना घेऊन चर्चा करणार आहे. आता या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे.
टोळीचा मुळापासून बंदोबस्त केला पाहिजे : मनोज जरांगे
सरकार काय यांना संपवत नाही आता आम्हाला संपवावा लागणार आहे. आता मी मनावर घेतला आहे.
आता यांना सुट्टी देऊन चालणार नाही. या टोळीचा मुळापासून बंदोबस्त लोकं घेऊन आम्हालाच करावा लागणार आहे. आता बोलायचं कमी आणि करून दाखवायचे, असेही जरांगे म्हणाले.
