TRENDING:

हवामानात मोठा उलटफेर! मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात विजांचा कडकडाट! IMD कडून २४ तासांसाठी मोठा इशारा

Last Updated:

पाकिस्तान अफगाणिस्तान वाऱ्यांमुळे इस्लामाबादकडून आलेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनने महाराष्ट्र कर्नाटकात मुसळधार पाऊस वादळी वारे गारपीट अलर्ट शेतकऱ्यांचे नुकसान.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतातील हवामानाला त्याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईसह उपनगरात अक्षरश: घामाच्या धारा सुटल्या आहेत. इतका उकाडा वाढला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. हीच स्थिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
4 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट
4 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट
advertisement

इस्लामाबादहून भारताच्या दिशेनं वारे पुढे सरकले असून सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरापासून काही अंतर जमिनीवर तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारपिटीचा अंदाज आहे.

पुढच्या 24 तासांत किमान तापमानात ४ अंशाने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात ४ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस तापमानात अंशत: घट होईल आणि पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाकी ठिकाणी हवामान ढगाळ राहील. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

advertisement

29 मार्च रोजी कोकण पट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 50 किमी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घेऊनच बाहेर पडा असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 30-31 आणि 1 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहील. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

advertisement

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. कोण्हेरी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतलेले पीक मातीमोल झाल्याने आर्थिक फटका बसला असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातल्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्यात. मागील काही दिवसांपासून तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. सकाळपासून कडक ऊन असताना संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

बारामती शहरात काल सायंकाळी अचानक वातावरणात मोठा बदल झाला असून, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.बारामती आणि परिसरात अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहताना दिसले, तर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हवामानात मोठा उलटफेर! मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात विजांचा कडकडाट! IMD कडून २४ तासांसाठी मोठा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल