TRENDING:

तलाठी-तहसीलदाराचा पगार किती? त्यांची निवड कशी केली जाते?

Last Updated:

पार्थ पवार यांच्या Ammedia Holdings LLP ने कोरेगाव पार्कमधील 1804 कोटींची जमीन 300 कोटींना घेतल्याचा आरोप, रवींद्र तारु व सूर्यकांत येवले निलंबित, चौकशीचे आदेश.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारु यांचं निलंबन करण्यात आलं आहे. हवेलीच्या दुय्यम उपनिबंधकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली.
News18
News18
advertisement

उपमुख्यमंत्री अजितदादा अडचणीत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आहे.तर, दुसरीकडे पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रविंद्र तारू निलंबित यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

advertisement

तलाठी तहसीलदाराला पगार किती

या सगळ्या प्रकरणानंतर आता तहसिलदार आणि तलाठ्याला नेमका किती पगार असतो याची चर्चा होत आहे. साधारणपणे तलाठ्याला 25,000 ते 81,000 रुपयांच्या आसपास पगार असतो. तहसीलदाराचा महिन्याला पगार 55,000 ते 1 लाख 75000 पर्यंत असतो. याशिवाय तहसीलदाराला घरभाडे, वाहतूक भत्ता आणि इतर सरकारी भत्त्यांचे लाभ मिळतात. MPSC गट अ अंतर्गत या पदावर निवड केली जाते. त्यामुळे ज्यांना तहसीलदार व्हायचं आहे त्यांना MPSC गट अ अंतर्गत परीक्षा द्यावी लागणार आहे. मूळ वेतनासोबत भत्ते जोडल्यामुळे एकूण पगार 55,100 पेक्षा जास्त असतो. तलाठ्याला पगाराव्यतिरिक्त 2400 रुपयांचा ग्रेड पे मिळतो. 34 टक्के महागाई भत्ता आणि HRA 30 टक्के मूळ पगारावर आधारित मिळतो. तलाठी भरतीचे अर्ज निघतात तिथून अर्ज करता येतो. तलाठी भरतीसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असणे आणि एमएससीआयटी (MS-CIT) किंवा समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी कंपनीनं घेतली जमीन

तब्बल 1804 कोटींची जमीन 300 कोटींना विकत घेतल्याचा आरोप

अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीनं वतनाची जमीन घेतल्याचा आरोप

40 एकर जमिनीसाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचा आरोप

केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश

सध्याच्या बाजारभावानुसार 21 कोटी स्टँप ड्युटी भरणं अपेक्षित

advertisement

सरकारी नियम वाकवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप

अमेडिया कंपनीचं भांडवल अवघं 1 लाख रुपये

कोरेगाव पार्कमध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी

सरकारच्या परवानगीविना वतनाची जमीन विकता येत नाही

परवानगी न घेता विक्री झाली तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो

महसूलमंत्री या जमीन जप्तीचे आदेश देणार?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १ हजार ८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचेही आरोप करण्यात आला. ही स्टँप ड्युटी माफ का करण्यात आली? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला.

advertisement

मुंढवा परिसरात तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला. सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टँप ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं. हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे का?सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात, तेव्हा लाखो रुपयांची स्टँप ड्युटी भरावी लागते. मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा “विशेष सूट” फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात? असा सवाल त्यांनी केलाय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूरकरांनो सावधान, विमानतळ परिसरात पतंग उडवताय? होणार कारवाई
सर्व पहा

हा व्यवहार १० कोटीच्या वरचा असल्याने EOW आणि ED ने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही कुंभार यांनी केली. १ लाख रुपये Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कसे आले ? अनसेक्युअर्ड लोन होते की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टर ने दिले असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तलाठी-तहसीलदाराचा पगार किती? त्यांची निवड कशी केली जाते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल