सोलापूरकरांनो सावधान, विमानतळ परिसरात पतंग उडवताय? होणार कारवाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहरातील विमानतळावरून काही दिवसांपूर्वीच सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळ परिसरात आता पतंग उडवण्यावर कारवाई होणार आहे.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरमध्ये विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. मुंबईहुन सोलापूरला एक विमान दाखल झाले. यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर विमानतळाच्या रनवेवर हे विमान लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला होता. त्यामुळे आता पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पतंग उडवणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
सोलापूर शहरातील विमानतळावरून काही दिवसांपूर्वीच सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या नई जिंदगी आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्यात येत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून नई जिंदगी आणि आजूबाजूच्या परिसरात आता पतंग उडवण्यावर कारवाई होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
advertisement
सोलापूर विमानतळावर नई जिंदगीकडील बाजूने सर्व विमाने लँड होतात तर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने विमान टेकऑफ होतात. अशा भागामध्ये काहीजण पतंग उडवत आहेत त्यामुळे पतंगाचा दोरा विमानाच्या विंगमध्ये अडकून मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणून विमानतळ परिसराच्या हद्दीत आता पतंग उडवणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
advertisement
तसेच पतंग उडवत असताना नायलॉन मांजा आणि चायनीज मांजाचा देखील वापर होत आहे. हा मांजा विक्रीसाठी बंदी असताना सुद्धा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मांजाचा वापर करत पतंग उडवणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
चायनीज मांजा आणि नायलॉन मांजा पक्ष्यांसाठी तसेच नागरिकांसाठी घातक आहे. तसेच विमानतळ परिसरात पतंग उडवणे, ड्रोन उडवणे अशा गोष्टींना परवानगी नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाची कोणतीही कृती नागरिकांनी करू नये. अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याचा सर्व नागरिकांनी भान ठेवावे आणि अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 06, 2025 7:20 PM IST


