Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने धक्का दिला, 13 खेळाडूंना बाहेरचा रस्ता, फक्त 5 खेळाडू रिटेन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 2026 च्या मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
मुंबई : मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 2026 च्या मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, त्याआधी मुंबईने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुढच्या सिझनसाठी मुंबईने फक्त 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे, तर 13 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
27 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे, त्यामुळे सर्व फ्रॅन्चायजींना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी आजची डेडलाईन देण्यात आली होती, त्यानुसार मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमासाठी मुंबईने वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट स्कीव्हर ब्रंट, अमनजोत कौर, जी कमालिनी आणि हिली मॅथ्यूज यांना रिटेन केलं आहे. पण तब्बल 13 खेळाडूंना मुंबई इंडियन्सने बाहेर केलं आहे.
advertisement
advertisement
मुंबईने बाहेर केलेले खेळाडू
पूजा वस्रकार, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, एमिलिया केर, नदिने डे क्लार्क, च्लोई ट्रायन, अक्षीता महेश्वरी, संजीवन सजना, सत्यमूर्ती कीर्तना, साईका इशाक, संस्कृती गुप्ता, अमनदीप कौर, जिंतामणी कलिता
मुंबईकडे किती पैसे उरले?
पाच खेळाडू रिटेन केल्यामुळे मुंबईचे लिलावाआधीच 9.25 कोटी रुपये खर्च झाले आहेत, त्यामुळे त्यांना लिलावामध्ये फक्त 5.75 कोटी रुपये उपलब्ध असतील. तसंच पाच खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांना लिलावात राईट टू मॅच कार्डही वापरता येणार नाहीये. मुंबईने रिटेन केलेल्या पहिल्या खेळाडूला 3.5 कोटी, दुसऱ्या खेळाडूला 2.5 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला 1.75 कोटी रुपये, चौथ्या खेळाडूला 1 कोटी आणि पाचव्या खेळाडूला 50 लाख रुपये दिले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने धक्का दिला, 13 खेळाडूंना बाहेरचा रस्ता, फक्त 5 खेळाडू रिटेन!


