Tata मोटर्सचा मोठेपणा, महिला संघाच्या खेळाडूंना देणार देशातली पहिली हायटेक SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतीय महिला संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता टाटा मोटर्सने भारतीय महिला संघाला मोठं गिफ्ट दिलं आहे.
मुंबई : तब्बल 25 वर्षांच्या संघर्षानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक 2025 जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता टाटा मोटर्सने भारतीय महिला संघाला मोठं गिफ्ट दिलं आहे. टाटा मोटर्स याच महिन्यात २५ नोव्हेंबर २०२५ रोजी टाटा सिएरा (tata sierra) लाँच करणार आहे. tata sierra ही प्रत्येक महिला क्रिकेट खेळाडूला दिली जाणार आहे.
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने एक विशेष घोषणा केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ती येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लॉन्च होणाऱ्या आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही 'टाटा सिएरा'ची पहिली बॅच भारतीय महिला क्रिकेट संघाला भेट म्हणून देणार आहे. या उपक्रमांतर्गत संघातील प्रत्येक खेळाडूला या एसयूव्हीचे टॉप मॉडेल दिलं जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्सनी सजलेली ही कार त्या खेळाडूंना समर्पित आहे ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला.
advertisement

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा म्हणाले की, “भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या उत्कृष्ट खेळ आणि ऐतिहासिक विजयाने देशाला अभिमानाची भावना दिली आहे. त्यांचा प्रवास हा दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि हेच मूल्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्समध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही या खेळाडूंना आणखी एक दिग्गज टाटा सिएरा भेट स्वरूपात देत आहोत. हा आमच्याकडून त्यांच्या जिद्दीला आणि देशाला दिलेल्या गौरवाला वाहिलेला एक खास सन्मान आहे.”
advertisement
Tata Sierra चे फिचर्सं
टाटा मोटर्स ९० च्या दशकामध्ये मार्केट गाजवणारी Sierra नव्या रुपात आणि नव्या ढंगात मार्केटमध्ये लाँच होणार आहे. भारतात नव्या Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच केलं जाईल. ही नवी सियारा ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफ़ॉर्मवर तयार केली आहे.
tata Sierra मध्ये 1.5 लिटर टर्बो–पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे 170hp आणि 280 Nm चा टॉर्क जनरेट करेल. या शिवाय 2.0-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा दिला आहे. Sierra मध्ये 6 मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे. या शिवाय SUV AWD (ऑल–व्हील ड्राइव्ह) टेक्नॉलजी सुद्धा दिली जाणार आहे. भारतात सियाराची किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होईल. भारतात या सियाराचा वाट पाहिली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 7:08 PM IST


