T20 World Cup ला 27 दिवस शिल्लक असताना टीमची घोषणा, फक्त 11 आयपीएल मॅच खेळणाऱ्याला केलं कॅप्टन!

Last Updated:

Ireland Announced Squad For T20 World Cup 2026 : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 साठी आयर्लंडने आपल्या 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे नेतृत्व करणार आहे.

Ireland Announced Squad For T20 World Cup 2026
Ireland Announced Squad For T20 World Cup 2026
Ireland Squad For T20 World Cup 2026 : आगामी काळात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आता सर्वच संघ घोषित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीम्सची घोषणा होत होती. अशातच आता शेवटच्या टीमने देखील आपले 15 खेळाडू जाहीर केले असून आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अधिक रोमांचक परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच एक टीम जाहीर झाली. त्यामुळे फक्त 11 आयपीएल मॅच खेळणाऱ्या खेळाडूला कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलंय. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून आयर्लँडचा कॅप्टन पॉल स्टर्लिंग आहे.

पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे नेतृत्व करणार

आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 साठी आयर्लंडने आपल्या 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे नेतृत्व करणार असून लॉर्कन टकर याच्याकडे उपकॅप्टन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयर्लंडला ग्रुप बी मध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, ओमान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांसोबत स्थान मिळाले आहे. या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात आयर्लंड 8 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधून करणार आहे.
advertisement

15 पैकी 12 खेळाडू जुने खेळाडू

आयर्लंडची ही टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील नववी वेळ असणार आहे. यापूर्वी 2009 आणि 2022 मध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी करत दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदाच्या संघात टिम टेक्टर, बेन कॅलिट्झ आणि मॅथ्यू हम्फ्रीज ही नवीन नावे पाहायला मिळत आहेत. निवडण्यात आलेल्या 15 पैकी 12 खेळाडू हे गेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील टीमचा भाग होते, ज्यामुळे त्यांच्याकडे मोठा अनुभव गाठीशी आहे.
advertisement

जोशुआ लिटल याच्यावर सर्वांच्या नजरा

या टीममध्ये 26 वर्षांचा फास्ट बॉलर जोशुआ लिटल याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. जोशुआ लिटल याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना ११ मॅचमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयर्लंडसाठी 74 टी-ट्वेंटीमध्ये 82 तर 42 वनडे मॅचमध्ये 61 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या धारदार बॉलिंगमुळे आयर्लंडला मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देण्याची मोठी आशा असेल.
advertisement
आयर्लंडची संपूर्ण टीम - पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क एडायर, रॉस एडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाईट आणि क्रेग यंग.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup ला 27 दिवस शिल्लक असताना टीमची घोषणा, फक्त 11 आयपीएल मॅच खेळणाऱ्याला केलं कॅप्टन!
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement