भारतातील या शहरात आहे रहमान डकैतचे घर, देशातील या शहरात झालंय Dhurandhar चं सर्वाधिक शूटिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dhurandhar Movie Shoot : 'धुरंधर' प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाचे शूटिंग नेमके कुठे झाले याची उत्सुकता व्यक्त करत आहेत. जाणून घ्या ‘धुरंधर’चे बऱ्यापैकी शूटिंग कुठे झाले आहे.
Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-ॲक्शन ड्रामा चित्रपट 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. रिलीज होऊन एक महिना उलटला तरीही प्रेक्षकांच्या डोक्यातून ‘धुरंधर’चा नशा उतरलेला नाही. एकदाच नाही, तर लोक दोन-दोन वेळा थिएटरमध्ये जाऊन ‘धुरंधर’ पाहत आहेत. याच कारणामुळे कमाईच्या बाबतीतही ‘धुरंधर’ भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट जितकी चर्चेत आहे, तितकीच चर्चा होतेय या फिल्मच्या लोकेशन्सची. आदित्य धरने केवळ कलाकारांवरच नाही, तर प्रत्येक लोकेशनवरही विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळेच चित्रपट रिलीज झाल्यानंतर रहमान डकैत म्हणजेच अक्षय खन्नाचं घरही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अखेर चाहत्यांनी ते घर कुठे आहे हे शोधून काढले आहे, जिथे रहमान डकैत आपल्या पत्नीसोबत राहतो.
भारतातील या शहरात आहे रहमान डकैतचे घर
चित्रपटाची कथा जरी पाकिस्तानमध्ये घडत असल्याचे दाखवण्यात आली असली, तरी त्याचे बहुतांश शूटिंग पंजाब आणि चंदीगडमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे, रहमान डकैतचे हवेलीसारखे घर अमृतसरमधील ऐतिहासिक लाल कोठी आहे, जिथे चित्रपटाच्या टीमने दोन दिवस शूटिंग केले होते. याशिवाय, चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन अमृतसर बस स्टँड, लुधियानातील खेडा गाव आणि सुखना लेक येथे शूट करण्यात आले आहेत. मात्र, या लोकेशन्सचा वापर इतक्या सफाईने करण्यात आला आहे की प्रेक्षकही गोंधळून गेले की आदित्य धरने खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन शूटिंग करण्याची परवानगी घेतली होती का?
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक लाल कोठीची तपासणी करताना दिसतात. त्याचवेळी, एक व्यक्ती ‘धुरंधर’मधील हवेलीशी संबंधित काही सीनचे फोटो हातात घेऊन, चित्रपटात दाखवलेल्या प्रत्येक भागाशी ते जुळवून पाहत आहे. मग ते रहमान डकैतचे दरवाज्यात बसलेले दृश्य असो, किंवा बाल्कनीतून लोकांना हात दाखवतानाचा सीन.
advertisement
'धुरंधर’मध्ये रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, सौम्या टंडन, सारा अर्जुन, आर. माधवन, गौरव गेरा आणि राकेश बेदी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या फिल्मने दणदणीत कमाई केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 11:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारतातील या शहरात आहे रहमान डकैतचे घर, देशातील या शहरात झालंय Dhurandhar चं सर्वाधिक शूटिंग











