किमती वस्तू समोर होत्या, पण चोराने चोरली अशी वस्तू; दुकानदारही स्तब्ध, डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Theft Video Viral : चोरीचा असा व्हिडीओ जो पाहिल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. किंबहुना जिथं या चोराने चोरी केली त्या दुकानादारालाही रडू आवरलं नाही.
चोरीचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक चोरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. सामान्यपणे चोरीच्या व्हिडीओमध्ये चोर कशापद्धतीने किती हुशारीने चोरी करतो हे दिसून येतं. ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीचे असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील., ज्यात चोराची लबाडी दिसून येते हा चोरीचा व्हिडीओही एका दुकानातील आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चोराची तुम्हालाही दया येईल.
चोरीचा असा व्हिडीओ जो पाहिल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. किंबहुना जिथं या चोराने चोरी केली त्या दुकानादारालाही रडू आवरलं नाही. कारण दुकानात मोबाईलसह इतर बऱ्याच किमती वस्तू होत्या. पण त्या एकाही वस्तूला चोरट्याने हात लावली नाही. त्याने असं काही चोरलं की ते पाहून तुमच्याही काळजाचं पाणी पाणी होईल.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका दुकानात एक माणूस येतो, तो दुकानदाराकडे काहीतरी मागतो. दुकानदार जेवत असतो, तो ताटावरून उठून दुकानाच्या आत जातो. पण त्यावेळी तो त्याच्या मोबाईल तिथंच ताटाजवळ ठेवतो. दुकानात आलेली व्यक्ती ताटाजवळ जाते, त्यावेळी हा आता मोबाईल चोरतो की काय असंच आपल्याला वाटतं. पण तो त्या ताटातील पोळी घेऊन पटापट आपल्या खिशात भरतो. जेव्हा ती व्यक्ती ताटातील भाकरी उचलते, तेव्हा त्यात दुकानात आधीपासून बसलेला एक लहान मुलगा जो कदाचित त्या दुकानदाराचा असावा तो उठतो आणि ताटाजवळी मोबाईल उचलून पुन्हा खुर्चीत बसतो.
advertisement
काही वेळाने दुकानदार परत येतो तेव्हा ताटाजवळ त्याला आपला मोबाईल दिसत नाही, दुकानात आलेली व्यक्तीही थोडी दूर गेलेली दिसते. त्यामुळे त्यानेच आपला मोबाईल चोरला असं त्याला वाटतो आणि तो त्या व्यक्तीला थेट मारायलाच लागतो. खिशात काय टाकलं आहे ते बाहेर काढायला सांगतो. ती व्यक्ती गुपचूप मार खाते आणि हळूच आपल्या खिशातून चोरलेली ती पोळी बाहेर काढून दाखवते आणि नंतर त्याचं लक्ष मुलाकडे जातं, तेव्हा आपला मोबाईल त्याच्या हातात असल्याचं पाहतो.
advertisement
दुकानदारही स्तब्ध होऊन पाहू लागतो. तो ती पोळी पुन्हा त्या व्यक्तीला देऊ करतो पण ती व्यक्ती काही ती पोळी घेत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर दुकानदार टेबलवर हात आणि डोकं ठेवून रडतानाही दिसतं. आपण जे केलं ते चुकीचं होतं, हे त्याला कळून चुकते. त्याने जे काही केलं त्याचा पश्चाताप त्याला होत असतो.
advertisement
advertisement
khichdishorts या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून प्रत्येक जण भावुक झाला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 10, 2026 11:03 AM IST
मराठी बातम्या/Viral/
किमती वस्तू समोर होत्या, पण चोराने चोरली अशी वस्तू; दुकानदारही स्तब्ध, डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा











