जबरदस्तीने Kiss, रक्तस्राव, असह्य वेदनांनी तडफडत राहिलेली रेखा; इतक्या वर्षांनी केला मोठा खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rekha Early Career Incident : बॉलिवूड अभिनेत्री रेखाला वयाच्या 15 व्या वर्षी एक आक्षेपार्ह सीन शूट करावा लागला होता. याचा उल्लेख 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये करण्यात आला आहे.
'उमराव जान' आणि 'सिलसिला'सारख्या चित्रपटांतून आपल्या जबरदस्त अभिनयाची छाप उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री रेखा. एक काळ असा होता, जेव्हा ती आपल्या उत्कृष्ट नृत्यासाठीही ओळखली जात होती. आजही ती आपल्या अदांनी लाखो लोकांची मने जिंकत असते. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली रेखा अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकली आहे. अमिताभ बच्चनसोबतच्या अफेअरच्या चर्चा असोत किंवा पती मुकेश अग्रवाल यांच्या दुर्दैवी निधनाची बाब. रेखा मात्र कायम चर्चेत राहिली.
advertisement
रेखाच्या आयुष्यातील अशा अनेक घटना वेळोवेळी समोर येत राहतात, ज्यातून तिचे आयुष्य सोपे नव्हते हे दिसून येते. आज आम्ही तिच्या आयुष्यातील अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. एका अभिनेत्याने सीनदरम्यान रेखाला जबरदस्तीने Kiss करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा खुलासा तिने स्वतः 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये केला आहे.
advertisement
‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ नुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक कुलजीत पाल यांनी रेखाची परवानगी न घेता एक किसिंग सीन शूट करण्याची योजना आखली होती. या सीनमध्ये बिस्वजीतला नायिकेसोबत म्हणजेच रेखासोबत रोमँटिक सीन करायचा होता. मात्र अचानकच त्याने रेखाला किस केले. त्याने तिला स्वतःकडे ओढले आणि जबरदस्तीने लिपलॉक करण्याचा प्रयत्न करू लागला. दिग्दर्शक कुलजीत पाल आणि राजा नवाथे यांनी हा सीन रेखाला काहीही न सांगता आधीच ठरवला होता. शूटिंग सुरू होताच बिस्वजीतने रेखाला सुमारे पाच मिनिटे किस केले.
advertisement
‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात पुढे लिहिले आहे की,"राजा नवाथे यांनी ‘ॲक्शन’ म्हणताच बिस्वजीतने रेखाला स्वतःकडे ओढले आणि किस करायला सुरुवात केली. या किसिंग सीनबद्दल आधी काहीच सांगितले नव्हते, त्यामुळे रेखा अचानक शांत झाली. कॅमेरा सुरूच राहिला आणि दिग्दर्शकाने ‘कट’ न म्हणता संपूर्ण सीन कॅमेऱ्यात कैद केला. सलग पाच मिनिटे बिस्वजीत रेखाला लिप किस करत राहिला.”
advertisement
रेखाला त्यावेळी खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला काय करावे हेच कळत नव्हते आणि तिला रडू येऊ लागले. तिने बिस्वजीतला दूर ढकलण्याचा खूप प्रयत्न केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्या वेळी दिग्दर्शकानेही हा सीन शूट करणं थांबवले नाही आणि तो जवळपास पाच मिनिटे सुरू ठेवला. शूट संपल्यानंतर रेखा धक्क्यात होती, घाबरलेली होती आणि रडत होती, तर सेटवर उपस्थित असलेले क्रू मेंबर्स हसत होते, शिट्ट्या वाजवत होते आणि टाळ्या वाजवत होते.
advertisement
advertisement
रेखा आणि बिस्वजीतचा ‘अंजना सफर’ या चित्रपटाला त्या किसिंग सीनमुळे सेन्सॉर बोर्डाचा सामना करावा लागला. जरी चित्रपटाचे शूटिंग 1969 मध्येच पूर्ण झाले होते, तरी निर्मितीतील विलंबामुळे हा चित्रपट दहा वर्षांनी दुसऱ्या नावाने रिलीज झाला. अखेर 1979 मध्ये ‘अंजना सफर’ हा चित्रपट ‘दो शिकार’ या नावाने प्रदर्शित झाला; मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला विशेष यश मिळाले नाही.










