Fridge Blast : बॉम्बसारखा फुटला फ्रिज, मुंबईत तिघांचा मृत्यू; फ्रिजचा स्फोट कसा होतो?

Last Updated:
Fridge Blast In Mumbai : फ्रिज जवळपास सगळ्यांच्या घरात आहेत. त्यामुळे मुंबईत एका घरात फ्रिजचा स्फोट झाल्याने आता फ्रिजबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे फ्रिजचा स्फोट होण्याची कारणं काय आहेत, ते पाहुयात.
1/5
मुंबईच्या गोरेगावमध्ये फ्रीजचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आजकाल फ्रिज जवळपास प्रत्येक घरात आहे. त्यामुळे अशी दुर्घटना तुमच्याही घरात होण्याचा धोका आहे. त्यामुळे फ्रिजचा स्फोट कसा काय होतो, त्यामागील कारणं प्रत्येकाला माहिती असायला हवीत.

advertisement
2/5
जेव्हा आपण फ्रिजच्या स्फोटाबद्दल बोलतो तेव्हा रेफ्रिजरेटरचा स्फोट होत नाही तर त्याचा एक भाग असतो. त्या भागाला कॉम्प्रेसर म्हणतात. कॉम्प्रेसर रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस असतो. त्यात एक पंप आणि एक मोटर असते. ही मोटर पंपद्वारे रेफ्रिजरंट गॅस कॉइल्समध्ये पाठवते. हा गॅस थंड होऊन द्रवात बदलतो तेव्हा तो रेफ्रिजरेटरमधून उष्णता शोषून घेतो आणि आतल्या सर्व गोष्टी थंड करतो. रेफ्रिजरेटरच्या कामाची ही सामान्य पद्धत आहे.

3/5
जेव्हा सामान्य परिस्थिती असामान्य होते, तेव्हा कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो. कॉम्प्रेसर सतत रेफ्रिजरंटमध्ये फिरवत असताना, रेफ्रिजरेटरचा मागचा भाग गरम होतो. यामुळे कंडेन्सर कॉइल्स आकुंचन पावतात, ज्यामुळे वायूचा मार्ग अडतो आणि तो बाहेर पडण्यापासून रोखतो. कॉइल्समध्ये वायू जमा होत असताना, दाब वाढतो. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे, या दाबामुळे धोकादायक स्फोट होऊ शकतो.

4/5
फ्रीजमध्ये थंडपणा टिकवण्यासाठी आइसोब्यूटेनसारख्या ज्वलनशील वायूचा वापर केला जातो. जर हा वायू लीक होऊन बंद खोलीत जमा झाला, तर फ्रीजचा दरवाजा उघडल्याने होणारी एक छोटीशी ठिणगी किंवा विजेच्या संपर्कात येणं एका मोठ्या स्फोटाला आमंत्रण देऊ शकते.

5/5
फ्रीजचा दीर्घकाळ वापर किंवा फ्रीजरमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा झाल्यास, कंप्रेसरला वायूचा प्रवाह करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यामुळे फ्रीजचा मागील भाग अति गरम होतो, आतील दाब वाढतो आणि स्फोट होण्याची स्थिती निर्माण होते. जे फ्रीज 15 वर्षांहून अधिक जुनी आहेत त्यांची वायरिंग, कंप्रेसर आणि वायू नियंत्रण प्रणाली कमकुवत होतात. यामुळे अपघाताचा धोका अनेक पटीने वाढतो.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement