2 तास 29 मिनिटांची ही मराठी फिल्म, वर्षाच्या सुरुवातीलाच थिएटरमध्ये घातलाय धुमाकूळ, पहिल्या आठवड्यातच केली बक्कळ कमाई

Last Updated:
Marathi Film Box Office Collection : 2 तास 29 मिनिटांची मराठी फिल्म सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यातच या फिल्मने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
1/7
 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा 2 तास 29 मिनिटांचा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालक आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ही फिल्म 1 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती.

advertisement
2/7
 मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

3/7
 पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपट हाऊसफुल जात असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत.

4/7
 चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.

5/7
 चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

6/7
 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी विद्यालय' हा महाराष्ट्राचा आपला महासिनेमा ठरला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या फिल्मने 6.14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

7/7
 ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement