Guess Who : 30 हजार मॅरेज प्रपोजल, एकेकाळी होता लाखो मुलींचा क्रश, पण 400 कोटी रुपयांत मोडलं स्वत:चं लग्न, कोण आहे हा सुपरस्टार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actor : बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला 30 हजार मॅरेज प्रपोजल आले होते. 100 रुपयांत त्याच्या करिअरची सुरुवात झाली असली तरी 400 कोटींमध्ये त्याचं लग्न मोडलं होतं. या सुपरस्टारचं आयुष्य एखाद्या ब्लॉकबस्टरपेक्षा कमी नाही.
advertisement
advertisement
हृतिक रोशनचा फिल्मी प्रवास एखाद्या स्टार किडसाठी सहजसोप्या जर्नीसारखा नव्हता. त्याची पहिली कमाई फक्त 100 रुपये होती. ही रक्कम त्याला 1980 रोजी रिलीज झालेल्या 'आशा' या चित्रपटासाठी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने बालकलाकार म्हणून नृत्य केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याचे आजोबा ओम प्रकाश यांनी केलं होतं आणि हृतिकने दिग्गज अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. इथूनच त्याच्या करिअरची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
advertisement
2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटाने हृतिक रोशनचं आयुष्यच बदलून टाकलं. चित्रपट रिलीज होताच हृतिक थेट सुपरस्टार बनला. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानंतर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हृतिकला 30 हजारांहून अधिक लग्नाच्या मागण्या मिळाल्या होत्या. त्या काळात एखाद्या नव्या अभिनेत्याला मिळालेली ही लोकप्रियता अभूतपूर्व होती.
advertisement
advertisement
advertisement










