Mumbai Crime : रात्री 12 ची वेळ, 'त्या' निर्णयावरून दोघींच बिनसलं, महिलेनंच महिला पार्टनरला संपवलं
Last Updated:
Woman kills Woman : सांताक्रूझ पश्चिममध्ये एका महिलेची चाकूने हत्या केल्याप्रकरणी 35 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून वाद झाल्याने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम परिसरात एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. 37 वर्षीय रेश्मा ढोणे या महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याच्या आरोपाखाली सांताक्रूझ पोलिसांनी 35 वर्षीय कामता कांबळे हिला अटक केली आहे. कामता कांबळेला प्रीती या नावानेही ओळखले जाते. ही घटना बुधवारी रात्री आरोपीच्या घरी घडली.
हत्येचे नेमके कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा ढोणे आणि कामता कांबळे या दोघी सांताक्रूझ पश्चिममधील फुलवाली गली परिसरात राहत होत्या. दोघीही घरगुती कामगार म्हणून काम करत होत्या. धक्कादायक म्हणजे या दोघी महिलांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते.
बुधवारी रात्री सुमारे 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान रेश्मा ढोणे आरोपीच्या घरी गेली होती. त्या वेळी कामता कांबळेने रेश्माला “तु मला का भेटत नाही?” असा प्रश्न विचारला. यावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला. वाद अधिकच वाढत गेला आणि रागाच्या भरात कामता कांबळेने रेश्माच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
advertisement
चाकूच्या गंभीर जखमेमुळे रेश्मा ढोणे जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी कामता कांबळेला ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : रात्री 12 ची वेळ, 'त्या' निर्णयावरून दोघींच बिनसलं, महिलेनंच महिला पार्टनरला संपवलं










