Crime News : मामा कामाला बाहेर जायचा अन् मामीकडून लैंगिक अत्याचार, संभाजीनगरमध्ये 19 वर्षाच्या भाच्यासोबत काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sambhajinagar Crime : आईच्या निधनानंतर शिक्षणासाठी मामाच्या घरी राहणाऱ्या पीडित मुलाला वारंवार घरातून हाकलून देण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले.
Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील एका कौटुंबिक नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मामीनेच भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. सामाजिक नीतिमत्तेला धक्का लावणाऱ्या एका प्रकरणातील धक्कादायक तपशील आता समोर आले असून, फिर्यादीने मांडलेली व्यथा ऐकून सुन्न व्हायला होते. या प्रकरणात आपल्या अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामीचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे.
बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने....
आईच्या निधनानंतर शिक्षणासाठी मामाच्या घरी राहणाऱ्या पीडित मुलाला वारंवार घरातून हाकलून देण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये आरोपी महिलेने पीडित युवकाला बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणाला काही सांगितल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले.
शरीरसुखाची मागणी
advertisement
मामा घरातून बाहेर गेल्यावर मामी भाच्याला छळत होती. मामीला त्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करायची. त्याला मुद्दामहून मिठी मारायची अन् प्रकरण पुढं गेल्यावर मामीने थेट त्याच्याजवळ शरीरसुखाची मागणी केली. त्याला धमकी दिली अन् शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पण एक दिवस मामाला हा सर्व प्रकार समजला.
advertisement
चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये मामाने या दोघांना रंगेहात पकडल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित मुलगा आपल्या वडिलांकडे निघून गेला होता. दरम्यान, आरोपी महिला जुलै 2024 मध्ये दुसऱ्याच व्यक्तीसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल असून 20 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र देखील सादर केले आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 8:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Crime News : मामा कामाला बाहेर जायचा अन् मामीकडून लैंगिक अत्याचार, संभाजीनगरमध्ये 19 वर्षाच्या भाच्यासोबत काय घडलं?










