HSC Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी; हॉल तिकीटबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Last Updated:

Download Class12 Hall Ticket : विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या बारावीच्या परीक्षेची हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करावी.

Class 12 hall ticket online Maharashtra
Class 12 hall ticket online Maharashtra
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेची हॉल तिकीट सोमवारी पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे
विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in किंवा http://www.mahahsscboard.in प्रवेश करून अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध असतील.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे आणि त्यावर शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांची असेल. जर प्रवेशपत्रावरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असेल तर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फी भरून दुरुस्ती अर्ज सादर करू शकतात. यामुळे परीक्षा केंद्रावर अडचण टाळता येईल.
advertisement
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रत नेहमी जवळ ठेवावी, कारण परीक्षा दरम्यान ही दाखवणे अनिवार्य आहे. योग्य माहिती आणि वेळेवर प्रवेशपत्र मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी सुरळीत होईल. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करून तपासणी करून, प्रिंट करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती अर्ज सादर करावा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
HSC Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी; हॉल तिकीटबाबत महत्त्वाची अपडेट समोर
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement