आजोबांच्या अंत्यविधीहून परतताना काळानं गाठलं, 2 चिमुकलींच्या वडिलांसोबत भयंकर घडलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: आजोबांच्या निधनाचे दुःख पचवण्याआधीच नातवाचा अकाली मृत्यू झाल्याने बाविस्कर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आजोबांच्या अंत्यविधीचा विधी पार पाडून परतणाऱ्या तरुणासोबत भयंकर घडलं. कन्नड-पिशोरी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मयूर अनिल बाविस्कर असं कन्नडच्या भिलपलटण येथील 29 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.
मयूर शुक्रवारी सकाळी पिशोर येथे आजोबांच्या अंत्यविधीसाठी गेला होता. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाने आधीच दुःखाच्या छायेत असलेला हा तरुण अंत्यविधी आटोपून दुचाकीने कन्नडकडे परतत होता. मात्र, प्रवासादरम्यान कन्नड–पिशोर मार्गावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याखाली घसरत जाऊन लोखंडी खांबाला जोरदार धडकली.
advertisement
या भीषण धडकेत मयूरच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मयूरला कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
आजोबांच्या निधनाचे दुःख पचवण्याआधीच नातवाचा अकाली मृत्यू झाल्याने बाविस्कर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयूरच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार असून, घरातील कर्ता पुरुष अचानक काळाने हिरावून नेल्याने कुटुंबाची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. गावातही या घटनेमुळे शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 9:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजोबांच्या अंत्यविधीहून परतताना काळानं गाठलं, 2 चिमुकलींच्या वडिलांसोबत भयंकर घडलं










